ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च

| Published : Oct 07 2023, 04:46 PM IST / Updated: Dec 26 2023, 11:53 AM IST

Bangalore_Bus_stop_stolen
ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू शहरातून चोरीची एक चित्र-विचित्र घटना समोर आली आहे. येथील कनिंगहॅम रोडवरील बस स्थानकात (Bangalore Bus stop stolen) बसवलेले 10 लाख रुपये किमतीचे स्टील धातूचे शेल्टरच चोरीला गेलंय.

 

Bangalore Bus stop stolen News : हायटेक सिटी बंगळुरूमधून चोरीची एक चित्र-विचित्र घटना समोर आली आहे. आठवडाभरापूर्वीच बांधलेलं बस स्टॉप (Bus stop worth 10 lakh stolen in Bengaluru) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. बस स्थानकात प्रवाशांसाठी बसवलेले 10 लाख रुपये किमतीचे शेल्टरच चोरट्यांनी लांबवलंय. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसंच पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनेही चोरट्यांचा शोधही घेत आहेत.

कंस्ट्रक्शन कंपनीने चोरीची तक्रार केली दाखल

बंगळुरू शहरातील कनिंगघम रोडवर नव्याने बस स्टॉप बांधण्यात आले होते. बस स्टॉपच्या बांधकाम कार्याची जबाबदारी बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनद्वारे (BMTC) दिली गेली होती. गंभीर बाब म्हणजे बसचे शेल्टर गायब झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर कंपनीचे असोसिएट व्हाइस प्रेसिडंट एन. रवी रेड्डी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र वर्दळ असणाऱ्या ठिकाणाहून बस स्टॉप चोरीला गेलेच कसे? अशा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

यापूर्वीही गायब झाले आहेत बस स्टँड

बंगळुरूमध्ये यापूर्वीही चोरीच्या चित्रविचित्र घडना घडल्या आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात एचआरबीआर लेआउट परिसरातून जवळपास 30 वर्षांपूर्वी बांधलेलं बस स्टॉप रातोरात गायब झालं होतं. याप्रकरणी परिसरातील रहिवाशांचे म्हणणे असे आहे की, कल्याण नगरमधील बस स्थानकाचे बांधकाम लायन्स क्लबने 1990मध्ये केले होते. पण एका व्यावसायिकासाठी येथे रस्ता तयार करण्यासाठी संबंधित बस स्टँड तेथून रातोरात हटवण्यात आलं होतं.

पोलीस करताहेत तपासणी

आता बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (बीएमटीसी) अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे की जर बस शेल्टर (New bus shelter stolen in Bengaluru) हटवण्यात आले आहे तर मग हे काम बंगळुरू महापालिकेकडून करण्यात आले असावे. कोणतीही पूर्वकल्पना न देता असा निर्णय घेणे चुकीचे आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे आता बस स्टॉप चोरीला गेलं आहे की हटवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच आहे.  

आणखी वाचा :

Sikkim Flash Foods : सिक्किममध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! पुरात लष्कराचे 23 जवान बेपत्ता

मॉडर्न शेतकऱ्याचा कारनामा! महागड्या ऑडीमधून स्टाइलने येतो व रस्त्यावर विकतो ताजी भाजी

किती तीव्र स्वरुपात भूकंप आल्यास इमारती कोसळू लागतात?