सार

Crime News: राजस्थानची राजधानी जयपूर येथे (Jaipur murder case) खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका माथेफिरू प्रियकराने आधी आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली आणि त्यानंतर चाकूने स्वतःचाही गळा कापला.

Jaipur Murder Case : राजस्थानची राजधानी जयपूर येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने एका तरुणाने रागाच्या भरात आधी आपल्या गर्लफ्रेंडची चाकूने भोसकून हत्या (Girlfriend Murder Case In Marathi)  केली आणि त्यानंतर स्वतःचाही गळा कापून घेतला. पण हा माथेफिरू प्रियकर (Jaipur Crime News In Marathi) बचावला आहे. मृत्यूशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. दरम्यान पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताहेत.

गर्लफ्रेंडसह रक्ताच्या सापडला होता तरुण

जयपूर येथील हरमाडा परिसरातील ही घटना आहे. परिसरातील लोहा मंडईजवळील एक खोलीमध्ये किशन नावाच्या तरुणाचा आणि त्याची गर्लफ्रेंड ज्योती रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. येथील स्थानिकांच्या मदतीने दोघांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळेस डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. दुसरीकडे किशनची प्रकृती नाजूक असून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

(ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च)

दोघांनाही करायचे होते लग्न

सर्कल इन्स्पेक्टर (CI) हिम्मत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन आणि ज्योतीचे प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न देखील करायचे होते पण ज्योतीच्या कुटुंबीयांचा या लग्नास नकार होता. यानंतर दोघांनीही एकत्रित जीव देण्याचा निर्णय घेतला (Crime News) आणि आत्महत्या करण्यासाठी एका निर्जन ठिकाणाची निवड केली. येथे पोहोचल्यानंतर किशनने आधी ज्योतीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःचाही गळा कापण्याचा (Jaipur Crime Update) प्रयत्न केला.

(Israel Vs Hamas : इस्रायल की हमास, लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली कोण? जाणून घ्या सविस्तर)

जन्मठेपेची होऊ शकते शिक्षा

दरम्यान या धक्कादायक घटनेची संपूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. मात्र ज्या कारमधून किशन आणि ज्योती घटनास्थळी पोहोचले होते. तेथे गाडीचा एक दरवाजा बराच वेळ उघडाच होता. अशा परिस्थिती स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी काही वेळाने ताबडतोब पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

(Venice Bus Accident : पर्यटकांनी भरलेली बस रेलिंग तोडून कोसळली रेल्वे ट्रॅकवर, 21 जणांचा मृत्यू)