सार
पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान मंगळवारी (13 फेब्रुवारी) पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अशातच आता पाकिस्तानात शहबाज शरीफ यांचे सरकार स्थापन होणार आहे.
Pakistan Election 2024 : पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान झाल्यानंतर तेथील राजकरण तापले आहे. अशातच देशातील प्रमुख पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) (PML-N) यांच्याकडून देशाचे माजी पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या युतीचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधानांच्या रुपात घोषित करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती देत पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) चे प्रवक्ते मरियम औरंगजेब (Marriyum Aurangzeb) यांनी म्हटले की, पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) चे प्रमुख नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांनी आपला भाऊ शहबाज शरीफ यांना पंतप्रधान म्हणून घोषित केले आहे. याशिवाय शहबाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज (Maryam Nawaz Sharif) हिला पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनवले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि शहबाज शरीफ यांचा भाऊ नवाज शरीफ यांनी पाकिस्तानातील मुस्लीम लीग (एन) पक्षाला पाठिंबा देणाऱ्या युतीतील राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत. नवाज शरीफ यांनी अशी अपेक्षा केलीय की, पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर येईल.
दरम्यान, पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) पक्षाला एकूण 75 जागांवर विजय मिळाला होता. याशिवाय पाकिस्तान पीपल्स पार्टीला (PPP) 54 जागांवर समाधान मानावे लागले होते.
इमरान खान यांच्या पक्षाचा पराभव
पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान मंगळवारी (13 फेब्रुवारी) पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto-Zardari) हे पाकिस्तानतील पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडले. यानंतर बिलावल भुट्टो जरदारी यांनी घोषणा केली की, पक्ष नव्या सरकारचा हिस्सा होणार नसून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षाचे समर्थन करेल.
दुसऱ्या बाजूला, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफकडून (Pakistan Tehreek-e-Insaf) स्वतंत्रपणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत 92 जागांवर यश मिळवता आले. पण आपल्या बळावर सत्ता स्थापन करण्यास असमर्थ राहिले. याशिवाय पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) किंवा पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबत युती करण्यास नकार दिला.
दरम्यान, शहबाज शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इमरान खान सत्तेवरुन बाजूला झाल्यानंतर शहबाज पाकिस्तानातील 23वे पंतप्रधान झाले होते. त्यावेळी शहबाज यांनी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत देशाची सूत्र आपल्या हाती घेतली होती.
आणखी वाचा :