सार

मालदिवमधील सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदिवचा (PPM) नेता झाहिद रमीझने भारतीयांविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर #BoycottMaldives हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये आहे.

Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिली होती. लक्षद्वीप दौऱ्यादरम्यानचे काही अप्रतिम फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर देखील केले. यानंतर गुगलवर लक्षद्वीपबाबत सर्वाधिक माहिती सर्च करण्यात आली. पर्यटनाच्या बाबतीत लक्षद्वीप हे ठिकाण मालदिव या परदेशी पर्यटनस्थळाला तगडी स्पर्धा देते. 

त्यामुळे लक्षद्वीपला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिल्यास याचा थेट परिणाम मालदिववर होऊ शकतो. यामुळेच पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमधील सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे फोटो-माहिती शेअर केल्याने मालदिवच्या सत्ताधारी पक्षाला जोरदार झटका बसला, असे दिसतेय.

मालदिवमधील सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदिव (PPM ) नेता झाहिद रमीझने भारतीयांची खिल्ली उडवत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) आक्षेपार्ह विधान केले. यामुळे लोकांचाही राग अनावर झाला आहे. सोशल मीडियावर युजर्स #BoycottMaldives हा हॅशटॅग वापरून आपला संताप व्यक्त करत आहे. शिवाय याद्वारे सोशल मीडियावर मालदिवविरोधात मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी 4 जानेवारीला लक्षद्वीपचे सुंदर फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावरील युजर Mr. Sinhaने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "ही एक उत्तम चाल आहे. चीन देशाची नवी कळसूत्री बाहुली मालदिवसाठी हा मोठा झटका आहे. तसेच यामुळे लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना मिळेल".

सिन्हाच्या पोस्टला उत्तर देत झाहिद रमीझने म्हटले की, "ही चांगली चाल आहे (The move is great). पण आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आमच्यासारखी ते (भारतीय) सेवा कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? खोल्यांमध्ये येणारी दुर्गंधच सर्वात मोठा फटका असेल. झाहिद रमीझने भारतीयांविरोधात असे आक्षेपार्ह विधान केले.

या पोस्टनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील युजर्सकडून झाहिद रमीझविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. नेटकऱ्यांनी मालदिववर बहिष्कार टाकण्याबाबत आणि लक्षद्वीपला आवडीचे पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याबाबत पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा

'Aditya L1'चा अंतिम कक्षेत प्रवेश, ऐतिहासिक कामगिरीबाबत पंतप्रधान मोदींनी केले ISROचे अभिनंदन

Watch Video: भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना शिकवला धडा, सुरक्षितरित्या हायजॅक झालेल्या जहाजाची केली सुटका

राम मंदिर उभारणीमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते होते? या व्यक्तीने केला खुलासा