सार

ISRO Aditya L1 Mission : भारताच्या पहिल्या सोलार मिशनला 6 जानेवारी रोजी सर्वात मोठे यश मिळाले आहे. 'आदित्य L1' उपग्रहाने आपल्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. यामुळे सूर्याशी संबंधित अनेक रहस्य उलगडण्यास मदत मिळणार आहे.

ISRO Aditya L1 Mission : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने ब्लॅक होल्सचे रहस्य जाणून घेण्यासाठी ‘XPoSat’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात यश मिळवले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर केवळ चार दिवसांतच भारताने आणखी एक इतिहास रचला आहे. 

भारताचे पहिले सोलार मिशन 'आदित्य L1'ने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ‘आदित्य L1’ उपग्रहाने आपल्या अंतिम कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. यामुळे सूर्याशी संबंधित अनेक रहस्यांची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

इस्रोने (Indian Space Research Organisation) मिळवलेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भारताची पहिली सौर वेधशाळा ‘Aditya L1’हे उपग्रह आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचले आहे. 

आमच्या शास्त्रज्ञांनी अंतराळातील अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या मोहिमा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याचाच हा पुरावा आहे. संपूर्ण देश या विलक्षण कामगिरीसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत आहेत, यामध्ये मी देखील सहभागी होत आहे”

चांद्रयान-3 मोहीमेच्या (Chandrayaan-3) यशानंतर केवळ नऊ दिवसांनंतर म्हणजेच 2 सप्टेंबर 2023 रोजी इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल1' उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. सूर्याच्या संशोधनासाठीची भारताची ही पहिलीच मोहीम आहे.

आणखी वाचा

ISRO XPoSat Satellite : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISROला मोठे यश, XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Watch Video: भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना शिकवला धडा, सुरक्षितरित्या हायजॅक झालेल्या जहाजाची केली सुटका

राम मंदिर उभारणीमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते होते? या व्यक्तीने केला खुलासा