सार

इराणने इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराण असा हल्ला करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.अखेर इराणने इस्त्रायलच्या जेरुसलेम शहरावर हल्ला केला. यावेळी इस्त्रायलने देखील प्रतिउत्तर देत इराणी क्षेपणास्त्रे हाणून पाडली.

Iran Israel Attack :  इराणने इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराण असा हल्ला करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.अखेर इराणने इस्त्रायलच्या जेरुसलेम शहरावर हल्ला केला. यावेळी इस्त्रायलने देखील प्रतिउत्तर देत इराणी क्षेपणास्त्रे हाणून पाडली.

एक एप्रिलला सीरियातल्या इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील असा इशारा इराणने याआधी दिला होता.इराणने एक एप्रिल रोजी सीरियातील आपल्या वाणिज्य दूतावासावर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचे वचन दिले होते, ज्यात एका उच्च कमांडरसह सात लष्करी अधिकारी ठार झाले होते.

इस्रायलच्या संरक्षण प्रणालीने इराणच्या क्षेपणास्त्रांना हवेत प्रत्युत्तर दिलं, यावेळी स्थानिकांना सायरन आणि मोठमोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले.इस्रायल, लेबनॉन आणि इराकने आपली हवाई क्षेत्रे बंद केली आहेत आणि सीरिया आणि जॉर्डनने त्यांच्या हवाई संरक्षण दलाल सतर्क केलं आहे. हा हल्ला इस्रायलने केल्याचा आरोप इराणने लावला होता. इस्रायलने हा हल्ला केल्याचं मान्यही केलं नाही किंवा त्यांनी त्यास नकारही दिला नाही.

इराणने अमेरिकेला दिली चेतावणी :

इराणने आता सांगितलं आहे की आम्ही आणखीन हल्ले करणार नाही पण इस्रायलने प्रत्युत्तरादाखल काही कारवाई केली किंवा अमेरिकेने हस्तक्षेप केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

संयुक्त राष्ट्र संघटनेने सर्व बाजूंना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे

या हल्ल्यामुळे हा प्रादेशिक संघर्ष अधिक विध्वंसक आणि मोठा होण्याची भीती आहे. त्यामुळे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोघंही देशांना शांती राखण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेने केले आहे.

ऑपरेशन 'मिशन ट्रू प्रॉमिस'

एक एप्रिलला सीरियातल्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यासाठीही इराणने इस्रायलला जबाबदार धरलं आहे.लवकरच इराण हल्ला करणार असं म्हंटल जात होत. त्यामुळे इराणच्या लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, हा हल्ला इस्रायलकडून होणाऱ्या सततच्या गुन्ह्यांना उत्तर म्हणून करण्यात आला आहे. इराणने जारी केलेल्या लष्करी निवेदनात या हल्ल्याला ‘Operation True Promise’ असं नाव देण्यात आलं आहे.

आणखी वाचा :

PM नरेंद्र मोदींची भेट घेणार एलॉन मस्क, काय असणार अजेंडा वाचा सविस्तर...

Israel Iran War : गाझा नंतर आता इस्रायल इराण संघर्ष पेटला ! युद्धजन्य परिस्थिती ,इस्रायलमध्ये जीपीएस आणि नेव्हिगेशन यंत्रणा बंद