सार

हमास नंतर आता इस्रायलचा इराणसोबत तणाव वाढला असून दोन्ही देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे इस्रायलमध्ये जीपीएस आणि नेव्हिगेशन यंत्रणा बंद करण्यात आली असून दुसरीकडे जवानांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

इस्रायलने सीरियामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक इराणी लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराण आता संतत्प झाला आहे. दोन्ही देशात तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. गाझानंतर आता इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा या देशांमध्ये युद्ध होणार का असा सवाल निर्माण झाला आहे. तसेच इराणकडून हल्ल्याच्या भीतीने इस्रायलने क्षेपणास्त्र रोखण्यासाठी जीपीएस यंत्रणा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर सैनिकांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

इराण लष्कराचा दुसरा मोठा अधिकारी ठार :

२०२० मध्ये अमेरिकेने इराणवर ड्रोन हल्ला केला होता. यामध्ये इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायलने सीरियाच्या राजधानीत इराणच्या राजनैतिक संकुलावर झालेल्या हवाई हल्ल्यात इराणी लष्कराचे कमांडर जनरल मोहम्मद रजा जाहेदी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे

इराण ५ एप्रिलनंतर कधीही हल्ला करू शकतो, असे इस्रायलला वाटत असून इराण ५ एप्रिल हा जेरुसलेम दिन म्हणून साजरा करतो.

इराण अप्रत्यक्ष इस्रायलच्या विरोधात :

आत्तापर्यंत गाझामध्ये हमाससोबत सुरू असलेल्या युद्धात इराण अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या विरोधात उभा राहिला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर दोन्ही देश आता आमनेसामने येण्याची शक्यत असून युद्ध पेटण्याची शक्यता आहे. यामुळे आता मध्य आशियात तणाव वाढणार असून अस्थिर वातावरण होऊ शकते. इराणकडून हल्ल्याच्या भीतीने इस्रायलनेही तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत इराणनेही आता प्रत्युत्तर दिल्यास दुसरे युद्ध सुरू होईल, अशी शक्यता समारीक तज्ञ व्यक्त करत आहेत.

इस्रायलची तयारी काय ?

इस्रायलने इराणचे लक्षरी हल्ले टाळण्यासाठी जीपीएस आणि नेव्हिगेशन प्रणाली बंद करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल मार्गदर्शित क्षेपणास्त्रे किंवा ड्रोनने हल्ला करू शकतो, अशी भीती इस्रायलची आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तेल अवीव आणि जेरुसलेमच्या लोकांनी लोकेशन बेस्ड ॲप वापरता येत नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय इस्रायलने लष्करातील सर्व लढाऊ तुकड्यांचे पत्ते देखील डिलीट केले आहेत. या शिवाय सैनिकांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या असून इस्रायलच्या सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढवण्यात आली आहे.

इस्रायलच्या तयारीमुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या दूतावासांकडून सतर्क करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. नागरिकांना देखील राशन घरात भरून ठेवण्यास संगितले आहे. इस्त्रायलने या हल्ल्याची अधिकृतपणे जबाबदारी घेतलेली नाही. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद रायसी यांनी या हल्ल्याला उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.

आणखी वाचा :

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्यानीचा मृत्यू , 2024 मधील हि 10 वी घटना

2024 च्या सुरुवातीलाच बाबा वेंगा यांचे हे 4 भाकीत ठरले खरे !