सार
Iran : इराणमध्ये एका तरुणाने वडील, भावासह 12 नातेवाईकांवर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. यादरम्यान सुरक्षा दलाने केलेल्या क्रॉस फायरिंगमध्ये आरोपी तरुणाचाही मृत्यू झाला.
Iran : इराणमध्ये एका तरुणाने वडील आणि भावासह 12 नातेवाईकांवर गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी (17 फेब्रुवारी) इराणमधील दक्षिण-मध्य प्रांतातील केरमान परिसर गोळीबाराने हादरला. दरम्यान सुरक्षा दलाने केलेल्या क्रॉस फायरिंगमध्ये आरोपी तरुणाचाही मृत्यू झाला आहे.
गोळीबारामुळे परिसरात खळबळ
शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय आरोपी तरुण एकामागून एक गोळ्या झाडत होता आणि यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक आटापिटा करत होते. गोळीबार करणारा तरुण इतका विचित्र वागत होता की त्याने स्वतःच्या वडील व भावाचाही जीव घेतला.
घरगुती वादामुळे गोळीबार?
या धक्कादायक घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर येत आहे. या कुटुंबामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते, याच वादाने टोक गाठले आणि त्यातून गोळीबाराची घटना घडली, असे म्हटले जात आहे.
इराणमध्ये सामूहिक हत्या होण्याच्या घटना दुर्मिळ
आरोपी तरुणाने Kalashnikov Assault Rifleने गोळीबार केल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. कारण स्थानिकांकडे शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या रायफल मोठ्या प्रमाणात आढळून येतात. दरम्यान आरोपी तरुणाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
आणखी वाचा