सार

Chhatrapati Shivaji Maharaj : लंडनमध्ये (London) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा : CM एकनाथ शिंदे

Chhatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी (London Mayor Michael Mainelli) यांनी गुरुवारी (15 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या बैठकीत मिलेनी यांनी लंडनमधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला (Artificial Intelligence Center) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे नाव देण्याचा मानस व्यक्त केला. मिलेनी यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतानाच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये पर्यावरण (Environment), स्वच्छ हवा (Clean Air), आर्टीफिशिअल इंटिलिजन्स (Artificial Intelligence), माहिती तंत्रज्ञान (Information Technology) याबाबत सविस्तर चर्चा झाली.

हे प्रकल्प ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र आणि लंडनमधील (Maharashtra and London) संबंध दृढ असून ते अधिक वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीला मोठा वाव असून भव्य पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्याने उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शवल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुंबई कोस्टल रोड, अटलसेतू सारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी अटल सेतूवरून प्रवास केल्याचा अनुभव सांगताना तो भव्य आणि दर्जेदार असल्याचे मिलेनी म्हणाले. 

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी आहे. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मागणी केली, यास सकारात्मक प्रतिसाद देतानाच लंडनमधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा मानस मिलेनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा

'आम्हाला मोदींची लोकप्रियता कमी करायचीय...', शेतकऱ्यांच्या आंदोलनामागील अजेंडा VIRAL VIDEOद्वारे उघड

बिहारचे CM नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, डीजीपींना पाठवली ऑडिओ क्लिप

सुप्रीम कोर्टाकडून Electoral Bonds योजना रद्द, SBIला 3 आठवड्यांत द्यावा लागेल अहवाल