Brazil Rains : ब्राजीलमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, 37 जणांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता

| Published : May 04 2024, 07:41 AM IST / Updated: May 04 2024, 07:45 AM IST

Brazil Rains and flood

सार

Brazil Rains : भारतातील बहुतांश ठिकाणी नागरिकांना भीषण गरमीचा त्रास सहन करावा लागतोय. पण जगातील काही देशांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरंतर, ब्राजीलमध्ये झालेल्या मुसळधार पावासामुळे पुराची स्थिती निर्माण झालीय.

Brazil Rains : ब्राजीलमधील काही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. ब्राजीलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे पुरामुळे ब्राजीलमधील स्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.

दरम्यान, ब्राजीलमधील दक्षिणेला असलेले राज्य ग्रांडे डो सुल येथे मुसळधार पाऊस पडला. अशातच पुरस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अनेकजण बेपत्ता झाले आहेत. राज्यातील नागरिक सुरक्षा एजेंसीने मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती दिली आहे.

ब्राजीलच्या राष्ट्रपतींचे ट्विट
ब्राजीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (Luiz Inácio Lula da Silva) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रपतींनी म्हटलेय की, "पावसामुळे फकटा बसलेल्या नागरिकांना पूर्णपणे मदत करण्यासाठी आमचे सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल." ब्राजीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 10 हजारांहून अधिक नागरिकांना आपले घर सोडावे लागले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
ब्राजीलमध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती अत्यंत बिघडत चालली आहे. नागरिक सुरक्षा एजेंसीने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आतापर्यंत 10 हजारांहून अधिक नागरिकांना आपले घर सोडावे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्राजीलमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडतोय. या पावसाचा 54 शहरांना फटका बसला आहे.

जगातील या ठिकाणांनाही पावसाने झोडपले
ब्राजील व्यतिरिक्त दुबई आणि सौदी अरबमध्ये पाऊस व पुरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय हजारो कोटींचे नुकसानही झाले आहे. सौदी अरबमधील उत्तरेला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हवामान खात्याने इशारा दिल्यानंतर मोठ्या संख्येने सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय दुबईत विमानतळ ते मॉल, मस्जीदही पाण्याखाली गेले आहेत.

केनियालाही पुराचा फटका
गेल्या काही दिवसांपूर्वी केनियामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय पावसाचे पाणी सर्वत्र साचल्याने काही ठिकाणचा शहराशी संपर्क तुटला आहे. राजधानीच्या दक्षिण दिशेला असलेल्या किटेंगेला येथे अथी नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने पुलावर पाणी साचले गेले होते. यामुळे हजारोंच्या संख्यने व्यावसायिक आणि कर्मचारी अडकले गेले होते.

आणखी वाचा : 

Israel Hamas Conflict : अमेरिकेतील विद्यापीठ-महाविद्यालयांमध्ये तीव्र आंदोलन, कोलंबियात 2 हजार विद्यार्थ्यांना अटक

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार, 87 जणांचा मृत्यू तर अनेक गावे पाण्याखाली