Jobs in India: नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करताय 86 टक्के कर्मचारी, ग्लोबल वर्कप्लेसच्या रिपोर्ट्समधून झालेत धक्कादायक खुलासे

| Published : Jun 13 2024, 09:55 AM IST / Updated: Jun 13 2024, 10:13 AM IST

workplace problem
Jobs in India: नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करताय 86 टक्के कर्मचारी, ग्लोबल वर्कप्लेसच्या रिपोर्ट्समधून झालेत धक्कादायक खुलासे
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Jobs in India : गॅलपच्या ग्लोबल वर्कप्लेस रिपोर्ट्सनुसार, भारतातील कर्मचारी आपल्या कामामध्ये नाखुश असले तरीही जबाबदारी म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय कर्मचारी तणावाचाही सामना करत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Global Workplace Report : देशातील कर्मचारी सध्या मोठ्या दबावाखाली काम करत असल्याची धक्कादायक बाब गॅलपच्या ग्लोबल वर्कप्लेस रिपोर्ट्समधून समोर आली आहे. सर्व्हेनुसार, देशातील 86 टक्के कर्मचारी आपल्या कामामुळे नाखुश आहेत. तरीही ते काम जबाबदारीने पार पाडत आहेत. केवळ 14 टक्केच कर्मचारी आपल्या कामामुळे आनंदित आणि संपन्न आहेत. हा आकडा जागतिक सरासरी 34 टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे.

ग्लोबल वर्कप्लेसच्या रिपोर्ट्समध्ये काय म्हटलेय?
अमेरिकेतील अ‍ॅनेलेटिक्स कंपनी गॅलपच्या (Gallup) ग्लोबल वर्कप्लेस रिपोर्ट्सनुसार, भारतातील कर्मचारी आपल्या कामामुळे आनंदित नाहीत. गॅलप जगभरातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणाच्या आधारावर रिपोर्ट तयार करते.

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना तीन कॅटेगरीत विभागले गेले. यामध्ये संपन्न, संघर्ष करणारे आणि पीडितांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, केवळ 14 टक्के भारतीय कर्मचारीच स्वत:ला कामाच्या ठिकाणी आनंदित आणि संपन्न मानतात. आकडेवारीनुसार 86 टक्के कर्मचारी कामामुळे त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी स्वत:ला संघर्ष करणारे आणि पीडित कॅटेगरीत ठेवले.

अन्न-वस्र, निवारा ते आजारांचा सामना करतायत
रिपोर्टमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी स्वत:ला 7 पेक्षा अधिक रेटिंग दिली आहे ते संपन्न कॅटेगरीतील आहेत. या सर्वांना पुढील पाच वर्षात आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील असा विश्वास आहे. याशिवाय 4 ते 7 दरम्यान रेटिंग असणाऱ्यांनी स्वत:ला संघर्षाच्या कॅटेगरीत स्थान दिले आहे. या व्यक्तींनी आपल्या आयुष्याबद्दल अनिश्चितता आणि नकारात्मक विचारांच्या स्थिती जाऊ असे म्हटले आहे. याशिवाय हे सर्वजण आर्थिक समस्यांचा सामनाही करत आहेत. या व्यतिरिक्त 4 आणि त्यापेक्षा कमी रेटिंग देणाऱ्यांनी स्वत:ला पीडित कॅटेगरीत ठेवले आहे. अशातच व्यक्तींना आपल्या भविष्यात काय होणार हे देखील माहिती नाही.

भारतापेक्षा नेपाळमधील कर्मचारी आनंदित
गॅलपनुसार, बहुतांश कर्मचारी खाण्यापिण्याच्या वस्तू, घर, आजारपण आणि हेल्थ इंन्शुरन्ससारख्या आव्हानांचा सामना करत आहेत. दक्षिण आशियात संपन्न कर्मचारी सर्वाधिक कमी प्रमाणात आहेत. भारतापेक्षा अधिक आनंदित नेपाळमधील कर्मचारी आहेत. येथे 22 टक्के कर्मचाऱ्यांनी स्वत:ला टॉप कॅटेगरीत ठेवले आहे.

भारतासह जगभरातील कर्मचाऱ्यांची स्थिती
भारतात जवळजवळ 35 टक्के कर्मचाऱ्यांना दररोज संतप्त होतात. श्रीलंकेच हीच आकडेवारी 62 टक्के आमि अफगाणिस्तानात 58 टक्के आहे. तरीही भारतीय कर्मचारी आपले काम जबाबदारीने पूर्ण करण्यामागे असतात. या प्रकरणात भारतीय कर्मचाऱ्यांची आकडेवारी 32 टक्के आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतीय कर्मचारी कामाच्या ठिकाणी नाखुश असले तरीही काम करतात हे स्पष्ट झालेय.

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा, G-7 परिषदेमध्ये होणार सहभागी, जाणून घ्या प्रमुख अजेंड्याबद्दल सविस्तर...

इटलीत महात्मा गांधींच्या प्रतिमेची खलिस्तान समर्थकांकडून तोडफोड, MEA तीव्र प्रतिक्रिया