पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा, G-7 परिषदेमध्ये होणार सहभागी, जाणून घ्या प्रमुख अजेंड्याबद्दल सविस्तर...

| Published : Jun 13 2024, 08:23 AM IST / Updated: Jun 13 2024, 08:31 AM IST

PM Modi

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अशातच लोकसभेच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा इटलीत असणार आहे. यासाठी आज पंतप्रधान रवाना होणार आहेत.

PM Modi Italy Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पदभार स्विकारल्यानंतर आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (13 जून) इटली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. यादरम्यान, पंतप्रधान मोदी जी-7 परिषदेत सहभागी होणार आहेत. याचे आयोजन इटलीमधील अपुलिया परिसरातील बोरगो एग्नाजिया येथे 13 जून ते 15 जूनपर्यंत करण्यात आले आहे.

7 विकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांसोबत करणार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय जी-7 परिषदेत सहभागी होण्यासह सात विकसित देशांसोबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला होणाऱ्या आउटरीच सेशनमध्येही उपस्थिती लावणार आहेत. या देशांसोबत विकासाच्या दृष्टीकोनातून नव्या संधींबद्दल आपले विचार त्यांच्या समोर मांडणार आहेत.

इटलीतील पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यासबत द्विपक्षीय वार्ता करणार आहे. मेलोनी यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची दुसरी भेट असणार आहे. यादरम्यान, इटली आणि भारतामधील संबंधाबद्दलही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

जी-7 परिषदेत या देशांचा समावेश
जी-7 परिषदेला इटलीने यंदा अल्जीरिया, ब्राझील, अर्जेंटीना, इजिप्त, केनिया, मॉरिटेनिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, ट्यूनीशिया, तुर्की, युएई व्यतिरिक्त युएनसारख्या काही आंतरराष्ट्रीय संघटनांना परिषदेसाठी बोलावले आहे. या सर्व देशांसोबत 14 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

या अजेंडावर भारताचे लक्ष
जी-7 परिषदेवेळी भारताकडून काही प्रमुख अजेंडे दुसऱ्या देशासमोर मांडणार आहे. यंदाच्या वर्षी समिटमध्ये रशिया-युक्रेन युद्ध, मिडल ईस्टमध्ये शांती समिटचा अजेंडा फार महत्त्वाचा राहणार आहे. विकासशील देश आणि विकसित अर्थव्यवस्थांसोबत संबंध मजबूत करणे देखील परिषदेवेळचा भारताचा प्रमुख अजेंडा असणार आहे. यामध्ये आफ्रिका आणि इंडो पेसिफिक क्षेत्रावर भारताचे अधिक लक्ष असणार आहे. याशिवाय स्थलांतर, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, वातावरणातील बदल, फूड सिक्युरिटी असे काही मुद्देही परिषदेवेळी महत्त्वाचे असणार आहेत.

आणखी वाचा : 

इटलीत महात्मा गांधींच्या प्रतिमेची खलिस्तान समर्थकांकडून तोडफोड, MEA तीव्र प्रतिक्रिया

एलॉन मस्कने त्याच्या स्पेसएक्स इंटर्नशी लैंगिक संबंध ठेवले, अहवालात मिळाली माहिती

Top Stories