जस्टिन टुड्रो आणि केटी पेरी: कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन टुड्रो आणि हॉलिवूड स्टार केटी पेरी यांचा किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. घटस्फोटानंतर टुड्रो नवीन प्रेमाच्या शोधात होते. 

परदेशात कधी काय होईल हे सांगता येत नाही. तिथं रस्त्यावर, उघड्यावर जोडपे एकमेकांच्या जवळ जाऊन किस घेताना दिसून येतात. आता अशाच एका हायप्रोफाईल जोडप्याचा फोटो व्हायरल झाला आहे. हे कपल म्हणजे कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन टुड्रो हे असून त्यांचं आता वय ५३ वर्ष आहे. ते एका अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसून आले.

पंतप्रधानांची प्रियसी कोण आहे?

पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांची प्रियसी हॉलिवूडची स्टार केटी पेरी असून त्या दोघांचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे कॅनडाचे हे माजी पंतप्रधान घटस्फोटित असून, तीन मुलांचे वडील आहेत. 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता तेव्हापासून ते नवीन प्रेमाच्या शोधात होते. आता त्यांना चक्क हॉलिवूडची अभिनेत्रीच प्रेम मिळालं आहे.

केटी पेरी कोण आहे? 

अभिनेत्री केटी केरी ही स्वतः एक ब्रँड असून तिची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली आहे. तिचे "रोअर," "फायरवर्क्स," आणि "डार्क हॉर्स" ही लोकप्रिय गाणी जगभरात हिट आहेत. केटीची एकूण संपत्ती जवळपास ३,३०० कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहचली आहे. तिने तिच्या गाण्यांचे हक्क २२५ दशलक्ष डॉलर्सला विकले, त्यामुळं ती जगातील सर्वात श्रीमंत गायकांच्या यादीत जाऊन बसली.

केटीकडे कोणत्या गाड्या आहेत? 

केटीच्या मालकीच्या अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज-बेंझ पॉन्टन कॅब्रिओलेट, टेस्ला सायबरट्रक, कस्टम मिनी कूपर आणि फिस्कर कर्मा यांचा समावेश आहे. मोंटेसिटो, बेव्हरली हिल्स आणि लॉस फेलिझ सारख्या पॉश परिसरात तिचे बंगले देखील आहेत. दोघांच्या वयात जवळपास १३ वर्षांचा फरक आहे.