रशिया-युक्रेन युद्धाबद्दल डोनाल्ड ट्रंप यांची मोठी घोषणा, म्हणाले...

| Published : Jul 20 2024, 09:59 AM IST / Updated: Jul 20 2024, 10:23 AM IST

Donald Trump

सार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्रपती निवडणूकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रंप यानी रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांनी म्हटले की, निवडणुक जिंकल्यास पदभार सांभाळण्याआधीच युद्धाला पूर्णविराम देईन. 

Donald Trump and  Volodymyr Zelensky Phone Call : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीसाठी रिपब्लिकन पार्टीकडून उभे असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यामध्ये फोनवरुन बातचीत झाली. याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांनी माहिती देण्यासह राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची निंदाही केली. याशिवाय ट्रंप यांनी अशी घोषणा केली आहे की, मी जर अमेरिकेतील पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास रशिया-युक्रेनमधील युद्धाला पूर्णविराम देईल. खरंतर, राष्ट्राध्यक्षांचा पदभार स्विकारण्याआधीच युद्ध संपवेन असे डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रंप आणि झेलेंस्कीमध्ये फोनवरुन बातचीत
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासोबत झालेल्या बातचीतसंदर्भात माहिती देत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले की, ‘राष्ट्रपती झाल्यास जगात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी मी हिंसा संपवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या डीलवर बातचीत करण्याची अपेक्षा आहे. याशिवाय झेलेंस्की यांनी डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहिल्याने शुभेच्छाही दिल्या आहेत.’

डोनाल्ड ट्रंप यांनी नक्की काय म्हटले?
डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले की, मी अमेरिकेतील पुढील राष्ट्राध्यक्षाच्या रुपात जगभरात शांतता निर्माण करेन. याशिवाय युद्धाला पूर्णविराम देईन. दोन्ही पक्ष म्हणजेच रशिया आणि युक्रेन एकत्रित येतील आणि करारासंदर्भात चर्चा करतील. यामुळे हिंसा कमी होऊन समृद्धीचे मार्ग खुले होतील.

राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी काय म्हटले?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी देखील डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत झालेल्या बातचीत संदर्भात सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली आहे. दरम्यान, झेलेंस्की यांनी आपल्या पोस्टमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असणाऱ्या युद्धाला पूर्णविराम देण्यासंदर्भात कोणताही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. झेलेंस्की यांनी म्हटले की, “रशियाचा सामना करण्यासह आमची क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी युक्रेन नेहमीच अमेरिकेचा आभारी राहिल. माझी डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत व्यक्तिगत रुपात चर्चा झाली आणि यावर मी सहमती दर्शवली आहे.”

रशिया-युक्रेनच्या युद्धावर डोनाल्ड ट्रंप यांचा विचार
डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटले की, पुढील राष्ट्राध्यक्षांची निवडणूक जिंकल्यास जानेवारी महिन्यात पदभार स्विकारण्याआधी युद्ध संपवेन. याशिवाय फेब्रुवारी 2022 मध्ये राष्ट्राध्यक्ष असतो तर रशियाने युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवले नसते. ट्रंप यांनी आधीही अनेक वेळा रशिया-युक्रेनच्या सुद्धासंदर्भातील आपले विचार मांडले आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षात ट्रंप यांनी म्हटले होते शांती करारासाठी युक्रेनला काही क्षेत्र सोडावे लागू शकतात. दरम्यान, युक्रेन आपली एक इंच जमीन सोडण्यास अजिबात तयार नाही. खरंतर, रशियाने युक्रेनमधील चार क्षेत्र डोनेस्तक, खेरसॉन, लुहान्स्क आणि जापोरिजियावर ताबा मिळवला आहे.

आणखी वाचा : 

दुबईच्या राजकुमारीचा पतीला सार्वजनिक रुपात घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Donald Trump Attack News : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू हल्लेखोराचे नाव