Axiom-4: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज बुधवारी अंतराळात जाण्यासाठी उड्डाण केले. ते Axiom-4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातील. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ प्रवास करणारे ते दुसरे भारतीय असतील.
नवी दिल्ली- भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज म्हणजेच बुधवारी इतिहास घडवणार आहेत. अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय असतील. यापूर्वी १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी अंतराळात जाऊन सलग ८ दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्या होत्या. या निमित्ताने ४१ वर्षांनंतर अंतरराळात भारताचा झेंडा फडकणार आहे. तर आंरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय ठरणार आहेत.
आज दुपारी झाले प्रक्षेपण
नासाने मंगळवारी सांगितले होते की axiom-4 यानाचे प्रक्षेपण २५ जून रोजी प्रक्षेपित आहे. या मोहिमेत शुभांशु यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्याची संधी मिळेल. नासाने आपल्या निवेदनात म्हटले होते की Axiom मोहीम-४ बुधवार, २५ जून रोजी दुपारी १२:०१ वाजता प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणे अंतराळ यानाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
मोहिमेचे पायलट असतील शुभांशु
या ऐतिहासिक मोहिमेत भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पायलट म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोस्ज उजनांस्की-विस्नीवस्की, हंगेरीचे टिबोर कापू आणि मोहिमेच्या कमांडर अमेरिकन अंतराळवीर पेगी व्हिटसन देखील अंतराळात जाण्यासाठी उड्डाण केले आहे.
आतापर्यंत सहा वेळा पुढे ढकलली गेली मोहीम
हे प्रक्षेपण स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटद्वारे फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या प्रक्षेपण कॉम्प्लेक्स ३९ए वरून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मोहीम आतापर्यंत सहा वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रथम २९ मे रोजी प्रक्षेपित होणार होते, परंतु तांत्रिक आणि इतर कारणांमुळे तारखा वारंवार बदलल्या गेल्या. नासाने हे देखील सांगितले आहे की मोहिमेचे डॉकिंग २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४:३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होईल.
केरळचे सहा प्रकारचे बियाणे Axiom-4 मोहिमेद्वारे ISS वर होणार रवाना
अंतराळ संशोधन आणि पारंपरिक शेती यांचा अनोखा संगम घडवणारी ऐतिहासिक घटना लवकरच साकार होणार आहे. केरळ कृषी विद्यापीठाच्या (Kerala Agricultural University - KAU) संशोधनातून निवडलेली सहा अन्नधान्यांच्या विविध जातींची बियाणे Axiom Mission 4 (Ax-4) च्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे भारतीय अन्नधान्य प्रथमच सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (microgravity) असलेल्या अंतराळातील वातावरणात तपासली जाणार आहेत. ही मोहीम भारतासाठी केवळ शास्त्रीय नव्हे तर भावनिकदृष्ट्याही मोठा टप्पा ठरणार आहे.
कोणकोणती बियाणे जाणार अंतराळात?
Kerala Agricultural University ने पारंपरिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यात समतोल राखत सहा वेगवेगळ्या अन्नधान्यांच्या जाती निवडल्या आहेत. यामध्ये भात, मका, आणि अन्य स्थानिक पिकांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध आहे (तपशील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे).
यामागचा उद्देश काय?
- अंतराळातील वातावरणात भारतीय पिकांची उत्पन्न क्षमता, वाढीचा दर, आणि अनुवांशिक बदल याचा अभ्यास करणे.
- भविष्यातील मंगळ किंवा चंद्र वसाहतींसाठी अन्नधान्याची लागवड शक्य आहे का, याची प्राथमिक चाचणी घेणे.
- पर्यावरणीय तणावांना तोंड देणाऱ्या उच्च प्रतिच्या पिकांच्या जाती निर्माण करणे.
Axiom Mission 4 (Ax-4) बद्दल थोडक्यात
Axiom Space ही खासगी अमेरिकन संस्था NASA सोबत भागीदारी करून ISS कडे मानवी मोहिमा राबवते. Ax-4 हे त्यांचे चौथे मिशन असून, त्यामार्फत विविध देशांचे प्रयोग आणि संशोधन ISS वर पाठवले जाणार आहेत. यामध्ये भारतीय अन्नधान्यांचा समावेश होणे, हे भारतीय शेती आणि विज्ञान क्षेत्रासाठी अभिमानास्पद क्षण ठरणार आहे.
भविष्यातील वाटचाल
या मोहिमेच्या यशानंतर, आणखी अनेक भारतीय पिकांच्या जाती, विशेषतः जैविक व पारंपरिक शेतीशी संबंधित बियाण्यांची निवड करून त्यांचा अंतराळात अभ्यास करता येऊ शकतो. हे संशोधन भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.


