- Home
- Utility News
- महिन्याच्या अखेरीस बॅंक खात्यात 0 बॅलन्स आहे? तरीही काढता येतील 10 हजार, जाणून घ्या कसे?
महिन्याच्या अखेरीस बॅंक खात्यात 0 बॅलन्स आहे? तरीही काढता येतील 10 हजार, जाणून घ्या कसे?
Withdraw 10000 Rupees From Bank Account Even With Zero Balance : बँक खात्यात पुरेशी शिल्लक असेल तरच पैसे काढता येतात, हे सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की शून्य बॅलेन्स असतानाही तुम्ही 10 हजार रुपये काढू शकता?

शून्य बॅलन्सवरही पैसे काढण्याची संधी
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत (PMJDY) उघडलेल्या बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. इतकेच नाही, तर खात्यात एक रुपयाही नसताना 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधा मिळते. म्हणजेच, खात्यात पैसे नसतानाही, गरजेच्या वेळी तुम्ही 10 हजार रुपये काढू शकता.
ही सुविधा कशी मिळवायची?
जन धन खात्यांना बेसिक सेव्हिंग खाते मानले जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. तुमचा व्यवहाराचा इतिहास चांगला असेल, तर बँक लवकर मंजुरी देते. साधारणपणे बँका हा अर्ज नाकारत नाहीत. तुम्ही खाते सक्रियपणे वापरत असाल तर ओव्हरड्राफ्ट मिळवणे अधिक सोपे होते.
ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?
खात्यात पैसे नसतानाही बँक तुम्हाला ठराविक रक्कम काढण्याची परवानगी देते, त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. हे एक प्रकारचे छोटे झटपट कर्जच आहे. नंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर बँक ही रक्कम आपोआप वसूल करते.
या सुविधेवर व्याज आकारले जाते
ओव्हरड्राफ्ट हे देखील एक प्रकारचे कर्जच आहे. त्यामुळे तुम्हाला घेतलेल्या रकमेवर थोडे व्याज द्यावे लागते. असे असले तरी, गरजेच्या वेळी ही सुविधा खूप उपयुक्त ठरते. पैसे येईपर्यंत तुम्ही खर्चाचे व्यवस्थापन करू शकता.
ग्राहकांनी लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी
ओव्हरड्राफ्ट वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
* वारंवार ओव्हरड्राफ्ट घेतल्यास खाते निगेटिव्ह बॅलन्समध्ये जाऊ शकते.
* वेळेवर परतफेड न केल्यास क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो.
* प्रत्येक बँकेचे ओव्हरड्राफ्टचे नियम वेगवेगळे असू शकतात.
* फक्त आपातकालीन परिस्थितीतच या सुविधेचा वापर करणे योग्य आहे.

