POCO ने भारतात POCO X8 Pro सिरीज लॉन्च केली असून यात X8 Pro आणि X8 Pro Max हे दोन दमदार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. उत्कृष्ट परफॉर्मन्स, मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसह हे फोन मिड-प्रिमियम सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढवणार आहेत.
POCO X8 Pro Series Launched : स्मार्टफोन बाजारात स्पर्धा अधिक तीव्र होत असताना POCO ने भारतात आपली नवीन POCO X8 Pro सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये POCO X8 Pro आणि POCO X8 Pro Max हे दोन शक्तिशाली मोबाईल फोन सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, X8 Pro Max हा देशातील MediaTek Dimensity 9500S प्रोसेसरवर चालणारा पहिला स्मार्टफोन ठरला आहे.
किंमत आणि ऑफर्स
POCO X8 Pro 5G हा स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 35,999 रुपयांत उपलब्ध आहे. कंपनीकडून HDFC, SBI आणि ICICI बँक कार्डवर 3,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे, ज्यामुळे या फोनची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये होते. याशिवाय, कंपनीने आयर्न मॅन एडिशनही लॉन्च केला आहे.
डिस्प्ले आणि डिझाइन
POCO X8 Pro मध्ये 6.59-इंचाचा 1.5K रिझोल्यूशन असलेला M10 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि 3500 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. फोनमध्ये Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शनसह 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर
हा स्मार्टफोन Android 16 वर आधारित HyperOS 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Dimensity 8500 Ultra चिपसेट देण्यात आला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 3.4GHz पर्यंत आहे. याशिवाय Mali-G720 MC8 GPU आणि 3D लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानामुळे हा फोन हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी योग्य ठरतो.
कॅमेरा फीचर्स
फोटोग्राफीसाठी POCO X8 Pro मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP IMX882 OIS सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. तसेच, 20MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे. यामध्ये डायनॅमिक RGB लाइट्सही आहेत, जे नोटिफिकेशन दरम्यान आकर्षक इफेक्ट देतात.
बॅटरी आणि चार्जिंग
या स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 18 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग सपोर्ट देते. तसेच 100W फास्ट चार्जिंग आणि 27W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन अधिक उपयोगी ठरतो.
इतर फीचर्स
POCO X8 Pro मेटल फ्रेम डिझाइनसह येतो आणि IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगमुळे हा फोन पाणी व धुळीपासून सुरक्षित आहे. कंपनीकडून 4 वर्षांचे OS अपडेट आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्यात येणार आहेत, ज्यामुळे हा फोन दीर्घकाळ वापरण्यास योग्य ठरतो.


