भारतात ५ स्कुटर एकदम फॅमिली फ्रेंडली, खरेदी करून आजच आणा घरी
भारतात स्कुटरच्या किंमती कमी झाल्या आहेत. या लेखात होंडा ऍक्टिव्हा 6G, होंडा डिओ, सुझुकी ऍक्सेस 125 आणि टीव्हीएस एनटॉर्क 125 यांसारख्या कमी बजेटमधील लोकप्रिय स्कूटर्सची माहिती, त्यांचे इंजिन आणि फिचर्स यासह दिली आहे.

भारतात ५ स्कुटर एकदम फॅमिली फ्रेंडली, खरेदी करून आजच आणा घरी
भारतात सध्याच्या घडीला गाड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. त्यामध्ये स्कुटरच्या किंमती कमी झाल्याचं दिसून आलं आहे. आपण अशाच ५ स्कुटरबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
Honda Activa 6G
होंडा ऍक्टिव्हा हि गाडी सामन्यांच्या पसंतीस पडताना दिसून येत आहे. या स्कुटरमध्ये विश्वासार्ह इंजिन, i3S तंत्रज्ञान दिलं आहे. या स्कुटरला जवळपास ६० kmpl च ऍव्हरेज कंपनीकडून देण्यात आलं आहे. ट्युबलेस टायर दिल्यामुळं गाडीची पंक्चर होण्याची शक्यता कमी असते.
Honda Dio
होंडा कंपनीची ड्युओ हि एक स्वस्त आणि मस्त स्कुटर बाजारात आली आहे. Honda Dio ही नव्याने लाँच केली आहे. या स्कुटरची किंमत ६८,८४६ हजारांपासून सुरू होते. Dio चं हे अपडेटेड व्हर्जन आहे. या स्कुटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी अपडेट करण्यात आली आहे.
Suzuki Access 125
ऍक्सेस हि गाडी सर्वच गाड्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरली आहे. या गाडीला ग्राहकांनी मोठ्या आवडीने खरेदी केलं असून दिवसेंदिवस तिच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या स्कुटरमध्ये १२५ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनसाठी बेस्ट आहे. हे इंजिन ६,५०० आरपीएम वर ८.३ बीएचपी पॉवर आणि ५,००० आरपीएम वर १०.२ एनएम पीक टॉर्क निर्माण करतं.
TVS Ntorq 125
टीव्हीएस कंपनीची हि नवीन गाडी मार्केटमध्ये दमदार पद्धतीनं आली असून ती तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या स्कुटरची किंमतही 80,900 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Ntorq 125 मध्ये 124.8cc इंजिन आहे. या स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, दणकट फ्रेम आणि रोजच्या वापरासाठी पुरेशी मोठी स्टोरेज स्पेस आहे.

