- Home
- Utility News
- Year End Sale : Tata Motors च्या बजेट कार्सवर 1.85 लाखांपर्यंत सूट, 31 डिसेंबरपर्यंतच संधी!
Year End Sale : Tata Motors च्या बजेट कार्सवर 1.85 लाखांपर्यंत सूट, 31 डिसेंबरपर्यंतच संधी!
Tata Motors Announces Massive Year End Discounts : टियागो, अल्ट्रोज, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी या सारख्या लोकप्रिय आणि बजेट गाड्यांवर हा डिस्काऊंट मिळतोय. त्यामुळे वाहन खरेदी करण्याची ही मोठी संधी आहे. केवळ ३२ डिसेंबरपर्यंत ही सवलत मिळेल.

टाटा मोटर्सची डिसेंबर ऑफर
टाटा मोटर्सने डिसेंबर 2025 महिन्यासाठी वर्षाअखेरीच्या ऑफर्स आणि सवलतींची घोषणा केली आहे. या ऑफर्स MY24 आणि MY25 मॉडेलच्या गाड्यांसाठी 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत देशभरात लागू आहेत. हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही अशा टाटाच्या बहुतेक प्रवासी वाहनांच्या मॉडेल्ससाठी ग्राहक सवलत, एक्सचेंज बोनस, लॉयल्टी आणि कॉर्पोरेट फायदे मिळून या ऑफर्स तयार केल्या आहेत.
टाटा कार डिस्काउंट 2025
MY24 मॉडेल्सवर, टियागोवर एकूण 55,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. टिगोर कारवरही तेवढीच सवलत मिळत आहे. अल्ट्रोजच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सवर (रेसर वगळून) 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. अल्ट्रोज रेसर मॉडेलवर जास्तीत जास्त 1.85 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. पंच पेट्रोल आणि सीएनजी मॉडेल्सवर 75,000 रुपये, तर नेक्सॉनच्या सर्व इंधन प्रकारांवर 50,000 रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे.
टाटा कार एक्सचेंज बोनस
हॅरियर आणि सफारीच्या डिझेल मॉडेल्सवर प्रत्येकी 1 लाख रुपयांपर्यंत सूट आहे. कर्व (Curvv) MY24 मॉडेलवर 50,000 रुपयांचा थेट फायदा दिला जात आहे. MY25 मॉडेल्समध्ये, टियागो (XE वगळून) आणि टिगोर कारवर 35,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. टियागो XE ट्रिमवर या महिन्यात कोणतीही ऑफर नाही. जुन्या अल्ट्रोज मॉडेल्सवर 85,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. नवीन पिढीच्या अल्ट्रोज कारवर फक्त 25,000 रुपयांपर्यंतचा फायदा आहे.
टाटा कारच्या किमतीत घट
पंच पेट्रोल आणि सीएनजी मॉडेल्सवर लॉयल्टीसह 50,000 रुपये मिळत आहेत. नेक्सॉन MY25 मॉडेल्समध्ये, स्मार्ट आणि प्युअर ट्रिम्सवर 65,000 रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. इतर ट्रिम्सवर 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. डिझेल नेक्सॉनवरही 50,000 रुपयांची सूट आहे. कर्व MY25 मॉडेलवर 40,000 रुपये, तर हॅरियर आणि सफारी MY25 मॉडेल्सवर प्रत्येकी 75,000 रुपयांपर्यंतची ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
टाटा कार्सवर सुपर डील्स
कॉर्पोरेट, अलायन्स, SBI YONO, टाटा ग्रुपचे कर्मचारी आणि रेफरल योजनांद्वारे अतिरिक्त सवलत दिली जात आहे. विशेषतः SBI YONO द्वारे बुकिंग केल्यास, अल्ट्रोज, हॅरियर, सफारी मॉडेल्सवर अतिरिक्त रोख सवलत मिळेल. या वर्षाअखेरीच्या ऑफर्समुळे, नवीन कार खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी डिसेंबर महिना एक उत्तम संधी बनला आहे.

