WhatsApp वरील जुने संवाद शोधणे कठीण झालेय? लवकरच येणारे हे फीचर

| Published : Apr 18 2024, 07:00 AM IST / Updated: Apr 18 2024, 12:14 PM IST

 WhatsApp

सार

Tech News : व्हॉट्सअ‍ॅपकडून एक नवे फीचर लाँच केले जाणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला जुने संवाद शोधणे सोप्पे होणार आहे. 'चॅट फिल्टर' नावाने व्हॉट्सअ‍ॅपकडून नवे फीचर लाँच केले जाणार आहे.

WhatsApp New Feature :  सोशल मीडियावरील मेसेंजिग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवे फीचर्स रोलआउट करत असतात. जेणेकरुन युजर्सचा अ‍ॅप वापरतानाचा अनुभव नेहमीच उत्तम असावा. अशातच कंपनीकडून एक नवे फीचर लवकरच लाँच केले जाणार आहे. 'चॅट फिल्टर' नावाचे नवे फीचर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरील जुने संवाद शोधून देण्यास मदत करणार आहे. या फीचरबद्दलची माहिती कंपनीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर
कंपनीनुसार चॅट फिल्टरच्या मदतीने युजर्सला दुसऱ्या युजर्ससोबत केलेले संवाद पटकन शोधता येणार आहेत. यामुळे संवाद शोधण्यासाठी लागणारा वेळही वाचणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा बहुतांशजण खासगी कामासह व्यावसायिक कामासाठीही करतात. यामुळे एखाद्या युजर्ससोबत केलेला जुना संवाद शोधण्यास कठीण जाऊ नये म्हणून कंपनी चॅट फिल्टर लवकरच लाँच करणार आहे.

फीचरमध्ये असणार तीन फिल्टर्स
कंपनीकडून संवाद शोधण्यासाठी तीन फिल्टर्स दिले जाणार आहेत. यामध्ये All, Unread आणि Groups च्या नावाने फिल्टर्स असणार आहेत. यामधील ऑल फिल्टरमध्ये संपूर्ण संवाद दिसणार आहे. ग्रुप फिल्टरमध्ये ग्रुप चॅट आणि अनरीड चॅट्समध्ये न वाचलेले संवाद दिसून येणार आहेत. कंपनीने चॅट फिल्टर जगभरातील युजर्ससाठी रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे.

आणखी वाचा : 

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार आहात? या गोष्टींची घ्या काळजी

Plant Care : उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी घेण्यासाठी खास टिप्स