दुधात घाला हा पदार्थ, अंधुक नजर होईल तीक्ष्ण; डोळ्यांचा नंबर होईल गायब
मोबाईल आणि लॅपटॉपच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येऊन नजर अंधुक होते आणि डोळे कोरडे पडतात. यावर उपाय म्हणून मिरी, खडीसाखर आणि तुपाचे मिश्रण दुधासोबत घेण्याचा एक आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे.

दुधात घाला हा पदार्थ, अंधुक नजर होईल तीक्ष्ण; डोळ्यांचा नंबर होईल गायब
मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर वाढल्यावर आपले डोळे दुखायला सुरुवात होते. अशावेळी डोळ्यांवर ताण येतो, नजर धूसर होती आणि डोळे कोरडे पडायला सुरुवात होते. यावेळी काय करावं तेच आपण जाणून घेणार आहोत.
नैसर्गिक घटक डोळ्यांना देतात पोषण
आयुर्वेदिक परंपरेनुसार अनेक नैसर्गिक घटकांचा शरीराला फायदा होत असतो. त्यांच्यामुळं काही नैसर्गिक घटक हे शरीरातील वात-पित्त समतोल ठेवतात, डोळ्यांना पोषण देतात आणि ताण कमी करायला मदत करतात.
स्क्रीन टाइम वाढल्यामुळं नजर अंधुक होते का?
आज अनेकजण हे ऑनलाईन काम करतात. १० ते १२ तास सलग कॉम्प्युटरवर असल्यामुळं नजर हि अंधुक होत जाते. अशावेळी डोळे लालसर आणि कोरडे पडतात, डोळ्यांचे स्नायू थकतात.
मिश्रण तयार करून दुधासोबत घ्या
मिरीचे बारीक चूर्ण घ्या. त्यानंतर धाग्याची खडीसाखर चूर्ण बनवा. त्यामध्ये तूप गरम करून टाका. यानंतर काळ्या मिरीचे चूर्ण आणि खडीसाखरेचा चूर्ण तुपात मिसळून घ्या. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर बरणीत भरून टाका.
मिश्रण सेवन कसं करावं?
मिश्रणाचे सेवन करताना सकाळी आणि रात्री एक चमचा मिश्रण कोमट दुधासोबत घ्यावे असं सांगितलं जातं. कोमट दुधासोबत ते घेतल्यामुळं आपली नजर चांगली व्हायला मदत होते.
डोळ्यांची नजर अजून चांगली करण्यासाठी काय करायला हवं?
डोळ्यांची नजर अजून चांगली करण्यासाठी आपण आहारात हिरव्या भाज्या, गाजर, बदाम आणि आक्रोडचा समावेश करू शकता. आठवड्यात काही तास स्क्रीन डिटॉक्स करू शकता. पुरेशी झोप घेऊन पापण्यांचे उघडझाप करून बघा.

