- Home
- Utility News
- हिवाळ्यात टायरमध्ये किती ठेवावे एअर प्रेशर, तरच मिळेल चांगले मायलेज; जाणून घ्या माहिती
हिवाळ्यात टायरमध्ये किती ठेवावे एअर प्रेशर, तरच मिळेल चांगले मायलेज; जाणून घ्या माहिती
tyre air pressure in Winter : हिवाळ्यात तापमान कमी झाल्याने टायरमधील हवेवर परिणाम होतो, ज्यामुळे मायलेज कमी होऊ शकते आणि टायर लवकर खराब होतात. सुरक्षित ड्रायव्हिंग आणि चांगले मायलेज मिळवण्यासाठी टायरमध्ये योग्य प्रेशर ठेवणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात टायरमध्ये किती ठेवावे एअर प्रेशर
हिवाळ्यात तापमान कमी होत असल्यामुळं त्याचा परिणाम हा टायरवर मोठ्या प्रमाणावर पडत असतो. आपण टायरकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम पडून हवा लवकर जाते आणि टायर लवकर घासले जातात.
टायरमध्ये हवा वेळच्या वेळी भरणे आवश्यक
टायरमध्ये वेळच्या वेळी हवा भरणे आवश्यक असतं. चांगलं मायलेज आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करण्यासाठी टायरमध्ये वेळच्या वेळी हवा भरणे हे गरजेचं असतं. त्यामुळं आपण टायरकडे कायम लक्ष द्यायला हवं.
टायरमध्ये हवेचा योग्य प्रेशर असणं आवश्यक
टायरमध्ये हवेचा योग्य प्रेशर असणं आवश्यक असतं. टायरमध्ये कमी हवा असल्यास त्याला फिरवायला जास्त इंधनाची गरज लागते आणि त्यामुळं एव्हरेज कमी भेटण्याची शक्यता असते.
टायरचे आयुष्य मर्यादित
टायरमध्ये बरोबर हवा असली कि ते जास्त चांगले चालतात. योग्य हवा भरलेली असल्यास आपल्या गाडीला चांगलं मायलेज मिळत. त्यामुळं टायरच आयुष्य वाढायला मदत होते.
थंडीत टायरमध्ये किती प्रेशर ठेवायला हवा?
थंडीत टायरमध्ये बरोबर प्रेशर ठेवल्यास आपल्याला एव्हरेज चांगला मिळत जात. कंपनीने सांगितलेलं प्रेशर ठेवल्यास आपल्याला टायरमधील हवेचा दाब व्यवस्थित ठेवता येतो.
गाडीमध्ये हे छोटं डिव्हाईस न विसरता ठेवा
गाडीमध्ये छोटा पोर्टेबल एअर पंप ठेवण्याचा अवश्य प्रयत्न करायला हवा. आपल्याला यासाठी वेगळ्या विजेची गरज पडत नाही. गाडीतील यूएसबी पोर्टल जोडून आपण हवा भरू शकता.

