MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Eid Special: या सोप्या पद्धतीने हॉटेलसारखे हैदराबादी हलीम घरीच बनवा, करा दावत

Eid Special: या सोप्या पद्धतीने हॉटेलसारखे हैदराबादी हलीम घरीच बनवा, करा दावत

Eid Special: रमजान महिना म्हटलं की उपवास आणि प्रार्थनेसोबतच डोळ्यासमोर येते ते म्हणजे गरमागरम हलीम. पण हलीम खायचे असेल तर हॉटेलमध्येच जावं लागतं असं नाही. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरीही हैदराबादी हलीम बनवू शकता.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 18 2026, 10:02 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
हलीमसाठी लागणारे साहित्य
Image Credit : Gemini AI

हलीमसाठी लागणारे साहित्य

या डिशसाठी गहू, मटण किंवा चिकन, चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ लागते. सोबतच कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, तिखट, काळी मिरी पूड आणि हळद असे मसाले वापरतात. लवंग, वेलची, दालचिनीमुळे छान सुगंध येतो. शेवटी कोथिंबीर, पुदिना, तूप आणि लिंबाचा रस चव आणखी वाढवतात.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
अशी करा पूर्वतयारी
Image Credit : freepik

अशी करा पूर्वतयारी

सुरुवातीला गहू आणि डाळी स्वच्छ धुवून एक-दोन तास भिजवून ठेवा. त्याचवेळी, मटण कुकरमध्ये आलं-लसूण पेस्ट, मीठ, तिखट आणि हळद घालून मऊ शिजवून घ्या. मटण चांगलं शिजलं तरच हलीमला छान टेक्सचर येतो.

Related Articles

Related image1
Eid Special: एम्ब्रॉयडरी सूटसोबत पेअर करा हे फुटवेअर आणि दिसा हटके...
Related image2
Eid Fashion: ईदला सूटऐवजी ट्राय करा पूजा हेगडेच्या 'या' 6 साड्या, दिसाल हटके!
34
हलीम बनवण्याची पद्धत
Image Credit : Getty

हलीम बनवण्याची पद्धत

भिजवलेले गहू आणि डाळी कुकरमध्ये शिजवून मऊ करून घ्या. नंतर एका भांड्यात तूप किंवा तेल गरम करून कांदा तळा. त्यात लवंग, दालचिनी, वेलची घालून सुगंध येईपर्यंत परता. आता आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा. शिजवलेलं मटण आणि गहू-डाळीचं मिश्रण त्यात घालून चांगलं एकत्र करा आणि मंद आचेवर शिजू द्या. या टप्प्यावर मटणाचे तुकडे पूर्णपणे एकजीव होईपर्यंत मिश्रण घोटणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही रवी किंवा हँड ब्लेंडर वापरू शकता. झाली गरमागरम हलीम तयार!
44
हलीम खाण्याचे फायदे
Image Credit : our own

हलीम खाण्याचे फायदे

हलीममध्ये गहू, डाळी आणि मांस असल्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. यात प्रोटीन भरपूर असल्याने स्नायू मजबूत होतात. हे मऊ शिजवलेले असल्यामुळे पचायला खूप सोपे असते. उपवासानंतर हलीम खाल्ल्यास शरीराला त्वरित ताकद मिळते. म्हणूनच रमजानमध्ये हलीमला खास महत्त्व आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image2
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image3
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image4
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Recommended image5
Indian Railway Tracks : रेल्वे ट्रॅकवर खडी असते, पण मेट्रो ट्रॅकवर का नसते? जाणून घ्या कारण
Related Stories
Recommended image1
Eid Special: एम्ब्रॉयडरी सूटसोबत पेअर करा हे फुटवेअर आणि दिसा हटके...
Recommended image2
Eid Fashion: ईदला सूटऐवजी ट्राय करा पूजा हेगडेच्या 'या' 6 साड्या, दिसाल हटके!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved