जुन्या आणि नव्या kia seltos मध्ये काय राहणार फरक, जाणून घ्या माहिती
किया सेलटॉस लवकरच नवीन अवतारात भारतात दाखल होणार आहे. या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये वाढलेला आकार, नवीन कनेक्टेड एलईडी टेललॅम्प आणि ड्युअल १२.३-इंच स्क्रीनसह पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड असे मोठे बदल करण्यात आले आहेत.

जुन्या आणि नव्या kia seltos मध्ये काय राहणार फरक, जाणून घ्या माहिती
भारतात किया कंपनीची सेलटॉस गाडी लवकरच मार्केटमध्ये दाखल होणार आहे. हि गाडी मार्केटमध्ये आल्यानंतर त्यामध्ये नवीन काय अपडेट आले आहेत ते आपण सर्वात आधी जाणून घेऊयात.
किया कंपनीची हि गाडी येणार मार्केटमध्ये
या कारच्या मागील कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारांमध्ये या गाडीचा प्रकार येत असतो. त्यामध्ये खासकरून आकर्षक लूक भेटून जातो. किया कंपनीच्या गाड्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
कारचा आकार वाढला
कारचा आकार १०० मिमीने वाढवला आहे. राईड आरामासाठी, त्यात १८-इंच एरोडायनामिकली स्टाईल केलेले अलॉय व्हील्स आहेत. यामध्ये खासकरून नवीन अपडेट देण्यात आले आहेत.
मागच्या बाजूची डिझाईन
मागील बाजूस, त्यात नवीन लाईट सिग्नेचरसह कनेक्टेड एलईडी टेललॅम्प आहेत, जे आउटगोइंग मॉडेलवर आढळणाऱ्या पारंपारिक टेललॅम्प लेआउटपेक्षा वेगळे आहेत. त्यात पुन्हा डिझाइन केलेले रिफ्लेक्टरसह सुधारित बंपर देखील आहे, ज्यामुळे ते अधिक स्वच्छ लूक देते.
नवीन अपडेटेड व्हर्जन
जरी त्याचे जुने मॉडेल देखील प्रीमियम दिसत असले तरी, नवीन मॉडेल त्याच्यापेक्षा वरचे असल्याचे दिसते.
स्क्रीनची साईज राहणार मोठी
यामध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल ड्रायव्हर क्लस्टरसाठी दोन १२.३-इंच डिस्प्लेसह पुन्हा डिझाइन केलेले डॅशबोर्ड लेआउट आहे. मागील किआ सेल्टोसमध्ये १०.२५-इंच डिस्प्ले लहान होता. हवामान नियंत्रणासाठी तिसरा ५-इंच टचस्क्रीन सिट्रोसकडून घेतला आहे.

