US Airstrike on Venezuela Leads to State of Emergency : स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटे १.५० च्या सुमारास स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. व्हेनेझुएलाच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने काराकास, मिरांडा, अरागुआ आणि ला ग्वायरा येथे हल्ला केला.
US Airstrike on Venezuela Leads to State of Emergency : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला 'ताब्यात' घेतले असून, "मोठ्या प्रमाणावरील" हल्ल्यांनंतर त्यांना देशाबाहेर नेले आहे. तत्पूर्वी, व्हेनेझुएलाच्या सरकारने अमेरिकेवर अनेक राज्यांमधील नागरी आणि लष्करी तळांवर हल्ले केल्याचा आरोप केला होता आणि वॉशिंग्टनकडून करण्यात आलेला हा "लष्करी आक्रमकपणा" फेटाळून लावला होता. या हल्ल्यांच्या मालिकेनंतर राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या सरकारने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती.
व्हेनेझुएलावर अमेरिकेने हवाई हल्ला सुरू केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिकेने शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाच्या लष्करी तळांना लक्ष्य करून हवाई हल्ला केला. वृत्तानुसार, काराकासमध्ये अनेक मोठे स्फोट झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची भूमिका घेतली आहे. तर, निकोलस मादुरो यांनी तेल साठ्यांना लक्ष्य करणाऱ्या अमेरिकेच्या हल्ल्याचा एकत्रितपणे सामना करण्याचे आवाहन केले आहे. काराकासमधील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटे १.५० च्या सुमारास स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. व्हेनेझुएलाच्या स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेने काराकास, मिरांडा, अरागुआ आणि ला ग्वायरा येथे हल्ला केला आहे. हवाई हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
हल्ल्याची माहिती अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनला आधीच होती
काराकासमधील स्फोटांच्या काही वेळापूर्वी, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) अमेरिकन विमानांना व्हेनेझुएलाची हवाई हद्द वापरण्यास मनाई केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली होती. लष्करी कारवाईमुळे हा भाग सुरक्षित नसल्याचे FAA ने स्पष्ट केले आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता FAA ने याबाबत चार नोटिसा जारी केल्या होत्या. विशेष म्हणजे, नोटिशीमध्ये नमूद केलेल्या चार क्षेत्रांमध्येच सध्या व्यापक हवाई हल्ले झाले आहेत. तथापि, या कारवाईत कोणते सैन्य सामील आहे, हे FAA ने स्पष्ट केले नव्हते.


