- Home
- Utility News
- SIPमध्ये गुंतवणूक करताना किती तारखेला करायला हवी, जास्त रिटर्न मिळवण्याची पद्धत जाणून घ्या
SIPमध्ये गुंतवणूक करताना किती तारखेला करायला हवी, जास्त रिटर्न मिळवण्याची पद्धत जाणून घ्या
एसआयपी हा गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे, पण अनेक गुंतवणूकदारांना कोणत्या तारखेला गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल हे समजत नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीत तारखेचा फारसा फरक पडत नाही, तर गुंतवणुकीचा कालावधी जास्त महत्त्वाचा असतो.

SIPमध्ये गुंतवणूक करताना किती तारखेला करायला हवी, जास्त रिटर्न मिळवण्याची पद्धत जाणून घ्या
एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दीर्घकालीन कालावधीचा विचार करावा लागतो. आपण जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास एसआयपीमधून चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळं गुंतवणूक ही खासकरून जास्त कालावधीसाठी करायला हवी.
एसआयपी हा गुंतवणुकीतील सर्वात जास्त लोकप्रिय प्रकार
गुंतवणुकीच्या लोकप्रिय पद्धतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय प्रकार हा एसआयपी आहे. अनेक गुंतवणूकदार एसआयपी या प्रकारात गुंतवणुकीला सुरुवात करतात. एसआयपीमधून आपण म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यात येते. मात्र काही गुंतवणूकदारांना कोणत्या तारखेला गुंतवणूक केल्यास रिटर्न चांगले मिळतात हे मात्र त्यांना समजत नसते.
एसआयपीसाठी तारीख कोणती?
एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगली तारीख कोणती हे अनेकांना माहित नसते. कोणत्याही महिन्यातील 1,10,25 तारखेला गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीत मिळणारा परतावा जवळपास सारखा असतो. वार्षिक 0.2 ते 0.3 टक्के फरक असतो. 10 हजार रुपयांची एसआयपी 12 टक्के सीएजीआरच्या रिटर्ननं केल्यास 20 वर्षात 98 लाखांचा फंड तयार होईल. यात 0.2 टक्क्यांचा विचार केल्यास यापेक्षा अधिक रक्कम काही हजारांची असेल.
एसआयपी करताना कोणत्या तारखेला सुरु करावी?
एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना कोणत्या तारखेला करावी, याचा विचार करताना दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा लागत नाही. शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करताना याचा विचार करावा लागतो. शॉर्ट टर्म गुंतवणूक करताना मात्र तारीख निवडताना देखील विचार करायला हवा.
वित्तीय सल्लागार काय म्हणतात?
वित्तीय सल्लागारांच्या मते तुमचा पगार कधी जमा होतो याचा विचार करुन एसआयपी तारीख निवडावी. त्यामुळं एसआयपीची गुंतवणूक थांबत नाही. त्या रकमेचे तीन भागात वर्गीकरण करण्यात यावं असं अनेक जण सांगतात. एसआयपी करताना तारखेऐवजी दीर्घकालीन कालावधीचा जास्त परिणाम पडत असतो.

