Innova Crysta टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचं डिझेल मॉडेल बंद होणार असल्याच्या चर्चांना कंपनीनं पूर्णविराम दिला आहे. भारतात डिझेल गाड्यांना अजूनही मोठी मागणी असून BS6 मुळे त्या पर्यावरणपूरकच आहेत, असं टोयोटाचे एक्झिक्युटिव्ह विक्रम गुलाटी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे इनोव्हा क्रिस्टा बाजारात कायम राहणार असल्याचं कंपनीनं निश्चित केलं आहे.

Innova Crysta जार तुम्ही टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. टोयोटा आपली सर्वात लोकप्रिय MPV, इनोव्हा क्रिस्टा, कायमची बंद करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. लांबच्या प्रवासासाठी आजही क्रिस्टाच्या डिझेल मॉडेलवर अवलंबून असणाऱ्यांमध्ये या बातमीमुळे चिंतेचं वातावरण होतं. आगामी कठोर उत्सर्जन नियमांमुळे (emission norms) कंपनी हे मॉडेल बंद करेल, अशा अफवा पसरल्या होत्या. पण आता कंपनीने या सर्व चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कंपनीचं म्हणणं काय?

या सर्व चर्चा आणि अनिश्चिततेच्या वातावरणात, टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) चे कंट्री हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट विक्रम गुलाटी यांनी आता सत्य समोर आणलं आहे. 'ऑटो टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा त्यांना इनोव्हा क्रिस्टा बंद करण्याबद्दल आणि डिझेल इंजिनपासून दूर जाण्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "मला वाटतं या निव्वळ अफवा आहेत." गुलाटी यांच्या या एका वाक्याने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

डिझेल गाड्यांना आजही मोठी मागणी

विक्रम गुलाटी यांनी पुढे सांगितलं की, भारतात डिझेल गाड्यांना आजही मोठी मागणी आहे, विशेषतः अशा ग्राहकांमध्ये जे लांबचा प्रवास करतात आणि ज्यांना गाडीत दमदार टॉर्क आणि परफॉर्मन्स हवा असतो. "बाजारात आजही असे ग्राहक आहेत ज्यांना फक्त डिझेल गाडीच हवी आहे," असं ते म्हणाले. इंडस्ट्रीमध्ये बदल होत असले तरी, इनोव्हा क्रिस्टाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही आणि ते दुसरा पर्याय शोधत नाहीत, असा टोयोटाचा विश्वास आहे.

डिझेल गाड्यांचा उत्तम परफॉर्मन्स

डिझेल इंजिन म्हणजे प्रदूषण, असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. गुलाटी यांनी हा गैरसमजही दूर केला. त्यांनी सांगितलं की, BS6 उत्सर्जन नियम लागू झाल्यापासून डिझेल गाड्या पेट्रोल किंवा CNG गाड्यांइतक्याच स्वच्छ (clean) झाल्या आहेत. आता प्रदूषणाच्या बाबतीत सर्व गाड्या जवळपास सारख्याच आहेत. उलट, डिझेल गाड्या उत्तम परफॉर्मन्स आणि चांगलं मायलेज देतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टोयोटाचं व्हिजन मोठं आहे

देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी डिझेल गाड्या पूर्णपणे बंद केल्या असताना टोयोटाची ही भूमिका महत्त्वाची आहे. टोयोटाचा विचार थोडा वेगळा आहे. कंपनी इलेक्ट्रिक कार, फ्लेक्स-फ्युएल आणि हायड्रोजन टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. पण, त्यांना केवळ एकाच इंधनावर अवलंबून राहायचं नाही. गुलाटी यांनी स्पष्ट केलं की, भारताचं ऑटोमोबाईल भविष्य पूर्णपणे इलेक्ट्रिक किंवा फक्त एकाच तंत्रज्ञानावर अवलंबून नसेल, तर ते "मल्टी-फ्युएल" असेल. पेट्रोल, डिझेल, CNG आणि हायब्रीड या सर्वांची आपापली भूमिका असेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.