मोबाईल चार्ज करताना बनावट चार्जरचा वापर, रात्रभर चार्जिंग, आणि चार्जिंग सुरु असताना गेमिंग यांसारख्या चुका टाळणे महत्त्वाचे आहे. या सवयींमुळे फोनमध्ये उष्णता वाढून लिथियम आयन बॅटरीचे नुकसान होते आणि बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका असतो.
मोबाईलचा वापर करताना आपण काळजी घेणं गरजेचं असतं. रात्रभर ओव्हरचार्जींग, चार्जिंग सुरु असताना हेवी गेमिंग आणि जाड कव्हर्समुळे अति उष्णता तयार होत असते. त्यात असणारी अति उष्णता लिथियम आयन बॅटरीसाठी नुकसानदायक ठरत असते. आपण यावेळी ५ चुका टाळायला हव्यात.
बनावट चार्जरचा वापर
आपण बनावट चार्जरचा वापर करत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे. अनेक लोक सोशल मीडियावरून डुप्लिकेट चार्जर खरेदी करतात. त्यानंतर मोबाईलच्या आतमध्ये शॉर्टसर्किट होऊन त्याची बॅटरी पेट घेऊ शकते. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे.
रात्रभर चार्जिंग करण्याची सवय
आपल्याला रात्रभर चार्जिंग करण्याची सवय असेल तर यामुळं धोका होऊ शकतो. यामुळं आपली बॅटरी फुगू शकते. यावेळी रात्रभर चार्जिंगला फोन लावताना काळजी घ्यायला हवी.
हेवी गेमिंग आणि व्हिडीओ गेमिंग
फोन चार्जिंग करताना पबजी हा गेम खेळताना आपण जर मोबाईल चार्जिंगला लावला असेल तर सावधान. आपण मोठ्या गेम या फोन चार्जिंगला लावून खेळू नका. त्यामुळं आपल्या मोबाईलमधील बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.
उष्णता कोंडणे
आपण जर मोबाईलला जाड कव्हर लावले असतील तर त्यामुळं उष्णता हि कोंडली जाते. त्यामुळं आपल्या फोनमध्ये मागचा भाग हा गरम होतो. आपण गेम खेळताना बॅटरी चार्ज करताना फोनचे कव्हर काढून फायदेशीर ठरू शकते.


