- Home
- Utility News
- AIचा प्रभाव वाढला तरी 'या' ५ पदव्या राहणार Future-Proof!, करिअरसाठी आजच निवडा योग्य दिशा
AIचा प्रभाव वाढला तरी 'या' ५ पदव्या राहणार Future-Proof!, करिअरसाठी आजच निवडा योग्य दिशा
Top 5 Future-Proof Degrees in the Age of AI: AI अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवत असताना काही क्षेत्रात मानवी कौशल्ये अजूनही महत्त्वाची आहेत. आरोग्यसेवा, कायदा, कुशल व्यवसाय, शिक्षण, मानसिक आरोग्य क्षेत्रांतील पदव्या भविष्यातही करिअर सुरक्षित ठेवू शकतात.

Top 5 Future-Proof Degrees in the Age of AI: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) झपाट्याने अनेक क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव वाढवत आहे. अनेक नोकऱ्या, जे आजवर मानव करत होते, त्या आता एआय काही तासांत पूर्ण करू शकतो. परिणामी, भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तरीही काही क्षेत्रं अशी आहेत जिथं मानवी सहानुभूती, नैतिकता, संवेदना आणि सर्जनशीलतेचा महत्त्वाचा वाटा असल्याने AI तिथं फारसा प्रभाव टाकू शकत नाही. आज आपण अशा ५ पदव्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या भविष्यातही तुमचं करिअर सुरक्षित ठेवू शकतात.
1. आरोग्य व वैद्यकीय सेवा (नर्सिंग, डॉक्टर्स, मानसिक आरोग्य)
रुग्णांची काळजी घेणे, त्यांचं भावनिक भान राखणे, समजून घेणं ही कामं केवळ माणूसच करू शकतो. डॉक्टर, नर्स, समुपदेशक यांचं काम केवळ वैद्यकीय उपचारांपुरतं मर्यादित नसून, रुग्णाशी संवेदनशील संवाद साधणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. AI वैद्यकीय निदानात सहाय्यक ठरू शकतो, पण "मानवतेचा स्पर्श" देऊ शकत नाही.
2. कायदा आणि सार्वजनिक धोरण (Law & Public Policy)
वकिली, न्यायाधीश, कायदेशीर सल्लागार किंवा धोरण तयार करणारे अधिकारी या सगळ्यांना गहन विचार, नैतिक विवेक, अनुभव आणि मानवी तर्कशक्तीची गरज असते. AI कायदे वाचू शकतो, पण तो परिस्थितीनुसार "न्याय" देऊ शकतो का? नाही! त्यामुळे या क्षेत्रात अजूनही मानवी बुद्धीचे महत्त्व अबाधित राहील.
3. स्किल्ड ट्रेड्स व इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (Engineering, Skilled Labour)
प्लंबिंग, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, सिव्हिल इंजिनिअरिंग यासारख्या कामांमध्ये थेट हस्तकौशल्य, अनुभव आणि तांत्रिक निर्णयक्षमता आवश्यक असते. AI एखाद्या यंत्राचा नकाशा दाखवू शकतो, पण प्रत्यक्ष हातात स्क्रू-ड्रायव्हर घेऊन काम करणं हे AIला जमणार नाही!
4. शिक्षण व अध्यापन (Teaching & Academia)
शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे नाहीत, ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि भावनिक आधार असतात. AI विद्यार्थ्यांना उत्तरं देऊ शकतो, पण शिक्षकांप्रमाणे त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांची भूमिका भविष्यातही केंद्रस्थानी राहील.
5. मानसिक आरोग्य व सामाजिक कार्य (Psychology & Counselling)
मानसिक आरोग्य म्हणजे केवळ सल्ला देणं नव्हे, तर गोपनीयता, सहानुभूती, समजूतदारपणा आणि नैतिक निर्णयक्षमतेचा समतोल राखणं आवश्यक असतं. AI 'डेटा' वाचू शकतो, पण एखाद्याच्या अश्रूंमागचं दुःख समजून घेणं त्याला शक्य नाही. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांची मागणी सातत्याने राहील.
भविष्यात टिकायचंय? तर 'या' पदव्या आजच निवडा!
AI जग बदलतोय, पण माणसाचे काही गुण अजूनही अमूल्य आणि अप्रतिम आहेत. जर तुम्हाला भविष्यातलं करिअर सुरक्षित आणि अर्थपूर्ण हवं असेल, तर वरील क्षेत्रांत पदवी घेणं ही सर्वोत्तम गुंतवणूक ठरू शकते.

