MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • मोठी बातमी! टोलनाक्यांवर रोख व्यवहार कायमचे बंद; १ एप्रिलपासून 'हा' नियम अनिवार्य, खिशाला बसणार कात्री?

मोठी बातमी! टोलनाक्यांवर रोख व्यवहार कायमचे बंद; १ एप्रिलपासून 'हा' नियम अनिवार्य, खिशाला बसणार कात्री?

FASTag New Rule: केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर १ एप्रिलपासून रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. आता टोल भरण्यासाठी फक्त फास्टॅग, यूपीआय या डिजिटल पर्यायांचाच वापर करता येणार आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 22 2026, 04:09 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मोठी बातमी! टोलनाक्यांवर रोख व्यवहार कायमचे बंद
Image Credit : stockPhoto

मोठी बातमी! टोलनाक्यांवर रोख व्यवहार कायमचे बंद

पुणे : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोलनाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी १ एप्रिलपासून रोख रक्कम (Cash) स्वीकारणे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. आता टोल भरण्यासाठी केवळ डिजिटल पर्यायांचाच वापर करावा लागणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
टोल संकलनात आता 'डिजिटल' क्रांती
Image Credit : Asianet News

टोल संकलनात आता 'डिजिटल' क्रांती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील ११५० हून अधिक टोलनाक्यांवरील वसुली प्रक्रिया आता १००% डिजिटल होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचवणे, वाहतूक कोंडी फोडणे आणि इंधनाची बचत करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. 

Related Articles

Related image1
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
Related image2
चेन्नईत पर्यटनाचा थरार करुण अंतात बदलला, महाराष्ट्राच्या लेकीचा समुद्रात बुडून मृत्यू; जळगावचा तरुण अद्याप बेपत्ता
35
नव्या नियमात काय बदलले?
Image Credit : Google

नव्या नियमात काय बदलले?

१ एप्रिलपासून वाहनधारकांकडे टोल भरण्यासाठी खालील दोनच पर्याय उपलब्ध असतील.

१. फास्टॅग (FASTag): जो सध्या ९८% वाहनांवर आधीच कार्यान्वित आहे.

२. यूपीआय (UPI): क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची सुविधा. 

45
महत्त्वाची टीप
Image Credit : Gemini AI

महत्त्वाची टीप

जर तुमच्या वाहनावर वैध फास्टॅग नसेल, तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. तसेच, यूपीआय (UPI) वापरणाऱ्यांना मूळ दराच्या १.२५ पट रक्कम मोजावी लागू शकते. त्यामुळे फास्टॅग रिचार्ज असणे हाच सर्वात स्वस्त पर्याय ठरेल. 

55
या निर्णयाचे फायदे काय?
Image Credit : Google

या निर्णयाचे फायदे काय?

वाद मिटणार: सुट्ट्या पैशांवरून टोल कर्मचाऱ्यांशी होणारे खटके आता कायमचे बंद होतील.

वेगवान प्रवास: रांगा कमी झाल्यामुळे वाहनांचा वेग कायम राहील, परिणामी प्रदूषण आणि इंधनाचा खर्च कमी होईल.

पारदर्शकता: सर्व व्यवहार डिजिटल असल्याने टोल वसुलीत पूर्ण पारदर्शकता येईल.

प्रशासनाने सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, १ एप्रिलपूर्वी आपल्या वाहनाचा फास्टॅग तपासून घ्यावा किंवा तो वेळेत रिचार्ज करून ठेवावा, जेणेकरून प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Skoda Kushaq: स्कोडा कुशाकने १ लाख विक्रीचा टप्पा कसा गाठला? पाहा इनसाईड स्टोरी
Recommended image2
Robotics: आता डिलिव्हरीसाठी येणार रोबोट्स! JD.com च्या तब्बल ७ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
Recommended image3
AI Chatbots: तुम्हीही AI चॅटबॉट्ससोबत सिक्रेट्स शेअर करताय?, मेरिडिथ विटेकर यांनी उघड केले कंपन्यांचे 'डार्क सिक्रेट'
Recommended image4
Train Delay Rules : ट्रेन उशिरा झाल्यास प्रवाशांना मिळते फुकटात जेवण; IRCTC चे हे नियम माहितेयत का?
Recommended image5
Nissan Tekton: Creta चं टेन्शन वाढणार! ९ जुलैला लाँच होतेय Nissan ची 'Baby Patrol' दमदार SUV; पाहा पहिली झलक!
Related Stories
Recommended image1
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
Recommended image2
चेन्नईत पर्यटनाचा थरार करुण अंतात बदलला, महाराष्ट्राच्या लेकीचा समुद्रात बुडून मृत्यू; जळगावचा तरुण अद्याप बेपत्ता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved