Tata Sierra vs Curvv : टाटाने नवीन सिएरा लाँच करून भारतीय SUV बाजारात पुन्हा नॉस्टॅल्जियाला आकार दिला आहे. दुसरीकडे टाटा कर्व्ह आधुनिक, स्टायलिश आणि भविष्यवादी डिझाइनसह शहरी SUV खरेदीदारांना आकर्षित करते
Tata Sierra vs Curvv : टाटा मोटर्सने नुकतीच नवी टाटा सिएरा बाजारात आणली आहे. तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा तिची एंट्री झाली आहे. १९९१ मध्ये आलेली जुनी सिएरा तिच्या तीन-दरवाज्यांच्या डिझाइन आणि अनोख्या ‘ग्लास-बॅक’ लूकसाठी ओळखली जायची. त्या काळात ती मोठी हिट ठरली नसली तरी वर्षांनंतर तिची एक वेगळी चाहतावर्गातली ओळख निर्माण झाली. आता टाटाने सिएराची ही क्लासिक ओळख आधुनिक रुपात पुन्हा जिवंत केली आहे. त्यामुळे कंपनीची SUV लाइन-अप आणखी मजबूत झाली आहे. मात्र ग्राहकांसाठी मोठा प्रश्न असा “Tata Sierra आणि Curvv मध्ये नक्की काय फरक? कोणती SUV घ्यावी?”
टाटा सिएरा : क्लासिक आणि दमदार SUV अनुभव
नवीन सिएराचे डिझाइन पूर्वीच्या मॉडेलची आठवण करून देते. मोठे आणि ताकदवान बॉडी स्ट्रक्चर, उंच ग्राउंड क्लीयरन्स आणि रुंद कॅबिन यामुळे सिएरा खऱ्या अर्थाने एक पारंपारिक SUV वाटते.
- जुन्या सिएराची झलक असलेले आकर्षक डिझाइन
- प्रशस्त इंटिरियर आणि भरपूर लेगरूम
- रस्त्यावर दमदार उपस्थिती
- मजबूत आणि रफ-टफ SUV फील
- ज्यांना खरी SUV, जागा आणि ताकद हवी आहे, त्यांच्यासाठी सिएरा अचूक पर्याय ठरू शकते.
टाटा कर्व्ह : स्टाईल, फ्युचरिस्टिक डिझाइन आणि आधुनिकता
टाटा कर्व्हची रचना पूर्णपणे आधुनिक आणि भविष्यवादी शैलीची आहे.
- कूप-स्टाईल छताची रेषा
- तीक्ष्ण पॅनेल लाईन्स
- स्लिक आणि एरोडायनॅमिक लुक
- स्वच्छ आणि ट्रेंडी फिनिश
- ज्यांना क्रेटा, सेल्टोस, एलिव्हेट यांसारख्या SUV आवडतात पण अधिक स्टायलिश आणि हटके काही हवं आहे त्यांच्यासाठी कर्व्ह अगदी योग्य पर्याय आहे.
दोन्ही SUV मधील मुख्य फरक
जरी दोन्ही कार मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये आहेत, तरी त्यांची ओळख आणि लक्ष्यित ग्राहक वर्ग वेगवेगळा आहे.
कर्व्ह :
- आधुनिक, स्टायलिश आणि शहरी ग्राहकांसाठी
- फ्युचरिस्टिक एक्सटिरियर
- डिझाइनला प्राधान्य देणाऱ्यांसाठी
सिएरा :
- जागा, ताकद आणि क्लासिक SUV फील शोधणाऱ्यांसाठी
- अधिक मजबूत, प्रशस्त आणि दमदार लुक
- पारंपारिक SUV चाहत्यांसाठी
- टाटाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे कर्व्ह ही भविष्यवादी SUV, तर सिएरा ही आधुनिक रूपातील जुनी ‘ओळख’ आहे जी ग्राहकांच्या भावनांशी जोडली जाते.


