८०० कोटी रुपयांचा स्वरा बेबी प्रॉडक्ट्सचा (Swara Baby Products) आयपीओ २ डिसेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. यासाठी एका शेअरची किंमत १०५ ते १११ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई : शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आयपीओ (IPO) ही एक मोठी संधी असते. बाजारात आधीच लिस्ट झालेल्या कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा, जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच लोकांसाठी शेअर्स खुली करते, तेव्हा त्यात पैसे गुंतवणे म्हणजे आयपीओमध्ये भाग घेणे.

सध्या स्वरा बेबी प्रॉडक्ट्स (Swara Baby Products) कंपनीच्या आयपीओची बाजारात जोरदार चर्चा आहे. हा आयपीओ २ डिसेंबर रोजी खुला होणार असून, एका शेअरची किंमत १०५ ते १११ रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. या माध्यमातून कंपनी तब्बल ८०० कोटी रुपये उभे करणार आहे. पण, फक्त शेअर स्वस्तात मिळतोय म्हणून पैसे लावणे चुकीचे ठरू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी प्राईस बँड, कंपनीचा व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि धोके समजून घेणे खूप गरजेचे आहे.

Swara Baby Products IPO: महत्त्वाच्या तारखा आणि गुंतवणुकीची माहिती

२७ नोव्हेंबर २०२६ च्या घोषणेनुसार, या आयपीओचे महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: कंपनीचे नाव: Swara Baby Products Ltd, एकूण आयपीओ आकार: ८०० कोटी रुपये, प्राईस बँड: १०५ - १११ रुपये, दर्शनी मूल्य (Face Value): २ रुपये, नवीन शेअर्स (Fresh Issue): ५०० कोटी रुपये,

ऑफर फॉर सेल (OFS): ३०० कोटी रुपये. आयपीओ सुरू होण्याची तारीख: २ डिसेंबर २०२६, शेवटची तारीख: ४ डिसेंबर २०२६, अलॉटमेंट तारीख: ७ डिसेंबर २०२६, लिस्टिंग तारीख: ९ डिसेंबर २०२६, एक्सचेंज: NSE, BSE.

किमान गुंतवणूक किती करावी लागेल?

या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १३५ शेअर्स आहेत. जर आपण १११ रुपये या कमाल किमतीचा विचार केला तर: - एका शेअरची किंमत: १११ रुपये - किमान शेअर्स: १३५ - एका लॉटसाठी गुंतवणूक: १४,९८५ रुपये. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान १४,९८५ रुपये मोजावे लागतील.

गुंतवणूकदारांसाठी कोटा किती?

  • - संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB): ५०%
  • - बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII): १५%
  • - रिटेल गुंतवणूकदार (Retail): ३५%. कर्मचाऱ्यांसाठीही वेगळा कोटा ठेवण्यात आला आहे.

पात्र कर्मचाऱ्यांना अंतिम किमतीवर १० रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

Swara Baby Products कंपनी नक्की करते काय?

२०१८ मध्ये सुरू झालेली ही कंपनी लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी डायपर्स तसेच इतर स्वच्छता उत्पादने बनवते. डायपर निर्मिती हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. स्वतःच्या ब्रँडखाली उत्पादने विकण्यासोबतच ते दुसऱ्या कंपन्यांसाठीही माल बनवून देतात (Contract Manufacturing). स्वतःचे ब्रँड्स: Cuddles (लहान मुलांचे डायपर्स), Shields (मोठ्यांचे डायपर्स). फर्स्टक्राय (FirstCry) ची मूळ कंपनी ब्रेनबीज सोल्युशन्स (Brainbees Solutions), पिरामल फार्मा (Piramal Pharma) आणि हिमालया वेलनेस (Himalaya Wellness) यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत यांचे व्यावसायिक संबंध आहेत.

८०० कोटी रुपयांचा कंपनी काय करणार? 

आयपीओमधून मिळणारा पैसा कंपनी कुठे वापरणार हे पाहणे महत्त्वाचे असते. ५०० कोटींचे नवे शेअर्स आणि ३०० कोटींचे जुने शेअर्स (OFS) असा हा आयपीओ आहे. नव्या शेअर्समधून मिळणारा पैसा ३ ठिकाणी वापरला जाईल:

१. नवा कारखाना: मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे १९८.२ कोटी रुपये खर्चून नवा प्लांट उभारला जाणार आहे.

२. कर्जफेड: कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी १२७.५ कोटी रुपये वापरले जातील.

३. नव्या कंपन्यांची खरेदी: उर्वरित रक्कम भविष्यातील अधिग्रहण आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.

कंपनीची कमाई आणि नफा कसा आहे?

कोणत्याही गुंतवणुकीसाठी कंपनीची आर्थिक स्थिती पाहणे मस्ट आहे. २०२४-२५ मध्ये कंपनीचा महसूल ९४२.९८ कोटी रुपये तर निव्वळ नफा ८०.६७ कोटी रुपये होता. २०२५-२६ मध्ये महसूल वाढून १,१६३.९० कोटी रुपये आणि नफा ९५.५९ कोटी रुपये झाला आहे.

गुंतवणूक करण्यापूर्वी ५ मोठे धोके लक्षात घ्या!

१. एकाच उत्पादनावर अवलंबित्व: कंपनीचा ७९% महसूल फक्त लहान मुलांच्या डायपर्समधून येतो. या बाजारात स्पर्धा वाढली तर मोठा फटका बसू शकतो.

२. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग: कंपनी इतर ब्रँड्सवर खूप अवलंबून आहे. त्यांच्याकडून ऑर्डर्स कमी झाल्या तर व्यवसायाला फटका बसेल.

३. कर्ज: कंपनीवर असलेल्या कर्जामुळे व्याज खर्च वाढतो.

४. तगडी स्पर्धा: डायपर आणि हायजिन मार्केटमध्ये आधीच मोठ्या आणि प्रस्थापित कंपन्या आहेत.

५. OFS चा भाग: ३०० कोटी रुपये थेट प्रमोटर्सच्या खिशात जातील, कंपनीच्या विकासात नाही.

Swara Baby Products IPO-मध्ये पैसे गुंतवावेत का? 

१११ रुपयांच्या भावानुसार कंपनीचे व्हॅल्युएशन ३,२११ कोटी रुपये होते. कंपनीची वाढ, नफा आणि भविष्यातील प्लॅन्स चांगले असले तरी बाजारातील स्पर्धा आणि एकाच उत्पादनावरील अवलंबित्व या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर तुमचा दृष्टिकोन दीर्घकालीन असेल आणि तुम्ही रिस्क घेण्यास तयार असाल, तरच हा आयपीओ तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. लिस्टिंगच्या दिवशीच मोठा फायदा होईल याची खात्री देता येत नाही.