सोनं खरेदी करण्यासाठी अनेक जण घाई करताना दिसत आहेत. याआधी ही ज्यांनी घाई केली त्यांना आता मोठा फटका बसला आहे. कारण या महिन्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्याची योग्य वेळ आहे की नाही. सोन्याच्या किंमती आणखी घसरणार का याबाबत तज्ज्ञ काय सांगतात चला जाणून घेऊयात.
Gold Rate : एका महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ज्यामध्ये सुमारे २२,००० रुपयांची मोठी घट पाहायला मिळाली. लग्नसराईचे दिवस सुरु होत असताना देखील सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पण यामुळे अनेकांना दिलासा देखील मिळाला आहे. पण एक प्रश्नही निर्माण झाला आहे की, आता सोने खरेदी करावे की नाही, की आणखी वाट पाहावी? सोन्याच्या किमतीत होत असलेली घसरण पाहता आता खरेदी करावी की थांबावे? यावर तज्ज्ञांचे मत काय आहे, चला जाणून घेऊयात.
सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ?
सोन्याच्या किंमतीत घसरणीनंतर आता सोने खरेदी करावे का ? यावर तज्ज्ञांच्या मते, सोने एकदम खरेदी करण्याऐवजी ते टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. कारण, यापुढेही सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. 'SAHI' चे संशोधन प्रमुख गौरव अरोरा यांनी सांगितले की, अमेरिकेत महागाई वाढत आहे. ज्यामुळे अमेरिकेतील मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह'ची व्याजदर धोरणामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे.
'मल्टी कमोडिटी एक्सचेंज' (MCX) वर १० ग्रॅम सोन्याचा दर १,१७,९०० वर पोहोचला आहे. आता सोन्याची किंमत १० ग्रॅममागे १ लाख रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता कमी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ज्यांना लग्न किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी सोने खरेदी करायचे आहे, ते याचा नक्कीच फायदा घेऊ शकतील. पण सर्व रक्कम एकदम गुंतवण्यापेक्षा ठराविक अंतराने लहान-लहान भागांत सोने खरेदी करणे योग्य ठरेल.
सर्वसामान्यांनी काय करावे
जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करु शकतात. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, सर्व गुंतवणूक एकाच वेळी सोन्यात करू नका. त्याऐवजी, वेगवेगळ्या वेळी थोड्या-थोड्या प्रमाणात सोने खरेदी करा.
किमती आणखी कमी होणार का ?
सोन्याच्या किमतींबाबत अनिश्चितता कायम आहे. त्या आणखी कमी होतील या अपेक्षेने खरेदी लांबणीवर टाकू नका. कारण तज्ज्ञांचे मत आहे की, २०२७ पर्यंत सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. सोने खरेदी करून मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे ठरु शकते.














