सार
सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक महिन्याला केवळ 2 हजार रुपये जमा करुन मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेअंतर्गत मुलीला वयाच्या 21 व्या वर्षानंतर मोठी रक्कम परत दिली जाते. जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.
Sukanya Samriddhi Yojana : मुलींचे भविष्य सुरक्षित होण्यासह त्यांना आत्मनिभर करण्यासाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. आज शासनाच्या अन्य योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा लाखो नागरिकांनी लाभ घेतला आहे. ही योजना मोदी सरकाराने 5 जानेवारी 2015 मध्ये सुरू केली होती. योजनेअंतर्गत मुलीसाठी थोडे-थोडे पैसे जमा करुन तिचे शिक्षण ते लग्नासाठी पैशांची सोय करुन ठेवू शकता.
200 हजार रुपये प्रति महिना करा जमा
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सरकार सध्या 8.2 टक्के दराने व्याज देत आहे. एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांच्या मुलीच्या नावे प्रत्येक महिन्याला 2 हजार रुपये जमा केल्यास वयाच्या 21 व्या वर्षानंतर तिला 10,18,425 रुपये मिळतात. खरंतर, 2 हजार रुपयांच्या हिशोबाने 15 वर्षांपर्यंत जमा होणारी एकूण रक्कम 3,60,000 रुपये असेल. पण यावर चक्रवाढ व्याजानुसार मिळणारी रक्कम 6,58,425 रुपये होते. म्हणजेच मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिला एकूण 10.18 लाख रुपये असेल.
मुलीच्या 18 व्या वर्षात काढू शकता पैसे
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलीचे खाते तिच्या आई-वडिलांकडून सुरु केले जाऊ शकते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा एखाद्या बँकेत खाते सुरु करू शकता. यामध्ये मुलीच्या 18 व्या वर्षानंतर तिच्या शिक्षणासाठी काही रक्कम काढू शकता. दरम्यान, संपूर्ण रक्कम मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतरच काढली जाऊ शकते.
किती रुपयांची गुंतवणूक करावी?
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी वर्षाला 250 रुपये प्रति महिना आहे. या योजनेत अधिकाधिक 1.5 लाख रुपये प्रति वर्ष जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत घरातील कमीतकमी दोन मुलींसाठी खाते सुरू करू शकता. याशिवाय योजनेवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स सूटचा फायदा घेऊ शकता.
आणखी वाचा :
Share Market : ३ PSU Stocks खरेदी करायला विसरू नका
Medical Career: येथून MD पदवी घेतली तर तुम्हाला मिळेल कोटी रुपये पगार