Fitness Tips : जिममध्ये न जाताही रहा एक फिट, फक्त रोज फॉलो करा या सोप्या गोष्टी
अनेकजण शरीर स्लिम ठेवण्यासाठी, मसल्स वाढवण्यासाठी किंवा सिक्स पॅक बनवण्यासाठी जिमला जातात. पण जिममध्ये न जाताही शरीर फिट ठेवता येते. योगा हा एक अतिशय सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. यासाठी कोणत्याही उपकरणांची, विशेष कपड्यांची किंवा शूजची गरज नाही.

जिममध्ये न जाता शरीर फिट ठेवण्यासाठी टिप्स -
अनेकजण शरीर स्लिम ठेवण्यासाठी, मसल्स वाढवण्यासाठी किंवा सिक्स पॅक बनवण्यासाठी जिमला जातात. पण जिममध्ये न जाताही शरीर फिट ठेवता येते. यासाठी काही सोप्या पद्धती रोज फॉलो केल्यास पुरेसे आहे. त्या कोणत्या आहेत, ते या लेखात पाहूया.
योगा -
योगा हा एक अतिशय सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. यासाठी कोणत्याही उपकरणांची, विशेष कपड्यांची किंवा शूजची गरज नाही. फक्त एक मॅट पुरेशी आहे. ऑनलाइन अनेक मोफत योगा क्लास उपलब्ध आहेत. सोपी योगासने शिकून घेतली तरी पुरेसे आहे. रोज योगा केल्याने शरीर लवचिक होते आणि स्नायू मजबूत होतात.
बॉडी वेट ट्रेनिंग -
बॉडी वेट ट्रेनिंग केल्याने शरीर मजबूत होते. यासाठी तुम्ही लंजेस, स्क्वॅटिंग, पुश-अप्स, पुल-अप्स, चिन-अप्स, चेस्ट-अप्स, ट्रायसेप्स-डिप्स यांसारखे व्यायाम करू शकता.
चालणे आणि धावणे -
रोज चालण्याने किंवा जॉगिंग केल्याने शरीर सुडौल ठेवता येते. जे लोक जास्त वेळ एकाच जागी बसून काम करतात आणि ज्यांना लठ्ठपणाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा व्यायाम खूप उपयुक्त आहे. यामुळे पुरेशा कॅलरीज बर्न होतात आणि सांधे निरोगी राहण्यास मदत होते.
स्किपिंग -
रोज स्किपिंग केल्याने शरीर मजबूत होते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. तसेच, यामुळे हृदयाचे ठोके वाढण्यासही मदत होते.
पायऱ्या चढणे -
ज्या लोकांना जास्त शारीरिक हालचाल करता येत नाही, त्यांच्यासाठी पायऱ्या चढणे खूप फायदेशीर आहे. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

