सार
भारतीय स्टेट बँकेकडून एका महिन्याच्या कालावधीतील MCLR आधारित कर्जाच्या व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
SBI Loan Rate : देशातील सर्वाधिक मोठी शासकीय बँक म्हणून ओखळल्या जाणाऱ्या एसबीआयने MCLR आधारित कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत. एका महिन्याच्या कालावधीसाठी असणाऱ्या कर्जावर व्याज दर घटल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. व्याज दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. नव्या दरानुसार, एका महिन्याच्या कर्जाचे दर 8.45 टक्क्यांवरुन 8.2 टक्के झाले आहेत. यामुळे ज्या व्यक्तींना तत्काळ रुपात कर्ज घेऊन एका महिन्यात फेडायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. याशिवाय 3 महिने, 6 महिने,1वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी MCLR आधारित कर्जावरील व्याजाचे दर क्रमश: 8.5 टक्के, 8.85 टक्के, 8.95 टक्के, 9.05 टक्के आणि 9.1 टक्के असणार आहे.
MCLR म्हणजे काय?
कोणत्याही आर्थिक संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर लागू होणारे कमीत कमी व्याज दराला मार्जिल कॉस्ट ऑफ लेडिंग रेट म्हणजेच MCLR असे म्हटले जाते. या दराने कमी व्याजावर कोणतीही आर्थिक संस्था कर्ज देऊ शकत नाही.
1 एप्रिल 2016 रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्याज दर ठेवण्याच्या जुन्या बेस रेट सिस्टिमएवजी MCLR पद्धत लागू केली होती. 1 एप्रिल 2016 पूर्वी घेण्यात आलेले कर्ज जुन्या बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) पद्धतीअंतर्गत येतात. पण कर्जदार व्यक्ती याला MCLR च्या रुपात बदलू शकतो. MCLR आधारित कर्जाच्या व्याज दरातील बदल लगेच लागू केले जातात. मात्र MCLR साठी बँकेला अर्ज द्यावा लागतो.
आणखी वाचा :