प्रीमियमशिवाय मिळेल 7 लाखांचा विमा, जाणून घ्या कसे

| Published : Oct 14 2024, 11:54 AM IST

Insurance

सार

EPFO कडून आपल्या सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा कवच दिले जाते. EDLI योजनेअंतर्दत 15 हजार रुपयांहून अधिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही विम्याच्या प्रीमियमशिवाय याचा फायदा घेता येतो.

Insurance for EPFO Employee : एखादा विमा काढताना त्यासाठी प्रीमियम भरावा लागतो. पण प्रीमियमशिवाय विमा कसा काढायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरंतर, कर्मचारी भविष्य निधी संगठन म्हणजेच ईपीएफोकडून कर्मचाऱ्यांसाठी विम्यासंदर्भात एक खास योजना आहे. विम्यासाठी 7 लाख रुपयांचे कवच दिले जाते. या योजनेअंतर्गत विमा मिळणाऱ्या सदस्याला कोणत्याही प्रकारचे प्रीमियम शुल्क भरावे लागत नाही. EDLI योजनेच्या माध्यमातन ईपीएफो सदस्या विमा कवच मिळवू शकतो. यासाठी 15 हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असणे आवश्यक आहे.

योजनेची खासियत

  • ईपीएफोच्या सदस्याला विम्यासाठी कोणताही प्रीमियम द्यावा लागत नाही.
  • ईपीएफ सदस्य 12 महिन्यामध्ये मासिक वेतनाच्या 35 पट रक्कमेसाठी क्लेम करुन शकतो. यामध्ये अधिकाधिक रक्कमेची मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत आहे.

विम्याची रक्कम 12 महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावर अवलंबून आहे. विम्याच्या कवचसाठी क्लेम करताना अंतिम मूळ वेतन + महागाई भत्त्याचे 35 पटचा समावेश आहे. याशिवाय 1,75,000 रुपयांपर्यंतचा बोनस नॉमिनीला दिला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे गेल्या 12 महिन्यांचे मूळ वेतन+ महागाई भत्ता 15 हजार रुपये असल्यास विम्याच्या क्लेमची रक्कम (35X15,000)+ 1,75,000 = ₹7,00,000 रुपये होईल.

याशिवाय ईपीएफच्या सदस्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला विमा कवचसाठी दावा करण्याचा अधिकार आहे. नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. वय कमी असल्यास आई-वडिलांच्या नावावर क्लेमसाठी दावा करू शकतात. रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूपत्र, उत्ताराधिकारी पत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. अल्पवयीन मुलाचे पालक विम्यासाठी दावा करत असल्यास त्यांचे प्रमाणपत्र आणि बँक खात्याची माहिती जमा करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा : 

Gold Price Today : दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात वाढ, वाचा आजच्या किंमती

WhatsApp वर सीक्रेट चॅट्स असे लपवा, पाहा खास ट्रिक