MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Smartwatch Health Features : नवीन स्मार्टवॉच घेताय? हे ७ फीचर्स नक्की चेक करा!

Smartwatch Health Features : नवीन स्मार्टवॉच घेताय? हे ७ फीचर्स नक्की चेक करा!

तुम्ही जर नवीन स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल, तर हार्ट रेट, ECG, SpO2, स्लीप ट्रॅकिंग आणि फॉल डिटेक्शन यांसारखे ७ महत्त्वाचे हेल्थ फीचर्स त्यात आहेत की नाही हे नक्की तपासा.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 24 2026, 11:38 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
स्मार्टवॉच कसे निवडावे?
Image Credit : X

स्मार्टवॉच कसे निवडावे?

स्मार्टवॉचमध्ये आता फक्त वेळ बघण्याची सोय राहिलेली नाही. त्यात हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजन (SpO2), ECG, झोप, ताणतणाव, रक्तदाब आणि फॉल डिटेक्शन यांसारखे अनेक फीचर्स मिळतात.

स्मार्टवॉच खरेदी करणं वरवर सोपं वाटत असलं तरी तसं ते नाही. बाजारात असे अनेक मॉडेल्स आहेत जे बेसिक हेल्थ मॉनिटरिंगच्या पलीकडे जाऊन खूप काही ट्रॅक करण्याचा दावा करतात. आजकालच्या स्मार्टवॉचेसमध्ये सतत हार्ट रेट मॉनिटरिंग, रक्तातील ऑक्सिजनची पातळी (SpO2), ECG, स्ट्रेस ट्रॅकिंग आणि झोपेची गुणवत्ता तपासण्याची सोय असते.

पण हे सर्वच फीचर्स प्रत्येकासाठी उपयोगी नसतात. त्यामुळे पैसे खर्च करण्यापूर्वी प्रत्येक सेन्सर नक्की काय काम करतो हे समजून घेणं गरजेचं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
स्मार्टवॉचमधील हेल्थ फीचर्स
Image Credit : X

स्मार्टवॉचमधील हेल्थ फीचर्स

स्मार्टवॉच घेताना फक्त त्याचा डिस्प्ले, बॅटरी किंवा डिझाईन बघून चालणार नाही. त्यात कोणते हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स आहेत, ते कसे काम करतात आणि तुमच्या रोजच्या आरोग्यासाठी ते कितपत उपयुक्त माहिती देतात, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

काही फीचर्स तुम्हाला व्यायाम आणि शरीराच्या रिकव्हरीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करतात. तर काही तुम्हाला आरोग्यातील धोक्यांबद्दल आधीच सावध करतात, ज्यामुळे वेळीच वैद्यकीय मदत घेता येते. यासोबतच सेन्सर्सची अचूकता, क्वालिटी आणि ते तुमच्या स्मार्टफोनसोबत कसं काम करतं, हे मुद्देही लक्षात घेणं गरजेचं आहे.

Related Articles

Related image1
iPhone 18: आयफोन 18 येतोय, काय असतील नवे फीचर्स?
Related image2
WhatsApp Web: व्हॉट्सअॅप वापरताना काळजी घ्या, अधिकृत माहिती शेअर करू नका, केंद्राचा इशारा
34
कंटिन्युअस हार्ट रेट आणि SpO2 ट्रॅकिंग
Image Credit : X

कंटिन्युअस हार्ट रेट आणि SpO2 ट्रॅकिंग

स्मार्टवॉचमधील हार्ट रेट सेन्सर तुमची नाडी दिवसभर आणि व्यायामादरम्यानही सतत ट्रॅक करतो. विश्रांतीच्या वेळी तुमचा हार्ट रेट कसा असतो, व्यायामाची तीव्रता किती आहे आणि हार्ट रेटमध्ये काही असामान्य बदल होत आहेत का, हे यावरून समजते.

रक्तातील ऑक्सिजन (SpO2) मॉनिटरिंग:

SpO2 मॉनिटरिंगद्वारे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जाते. झोपताना किंवा इतर वेळी ऑक्सिजनच्या पातळीत होणारे बदल जाणून घेण्यासाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरते.

ECG मॉनिटरिंग:

ECG फीचर असणारं स्मार्टवॉच तुमच्या हृदयाच्या ठोक्यांच्या लयीची नोंद घेतं आणि 'एट्रियल फिब्रिलेशन' (AFib) सारखे धोके तपासतं. हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे.

ॲडव्हान्स्ड स्लीप ट्रॅकिंग:

साधं स्लीप ट्रॅकिंग तुम्हाला फक्त तुम्ही किती वेळ झोपलात हे सांगतं. पण ॲडव्हान्स्ड ट्रॅकिंगमध्ये तुम्ही हलक्या (Light), गाढ (Deep) आणि स्वप्नावस्थेतील झोपेत (REM sleep) किती वेळ होता, याची अचूक माहिती मिळते.

44
स्ट्रेस, HRV आणि ब्लड प्रेशर ट्रॅकिंग
Image Credit : X

स्ट्रेस, HRV आणि ब्लड प्रेशर ट्रॅकिंग

काही स्मार्टवॉचेस तणाव आणि बॉडी रिकव्हरी मोजण्यासाठी 'हार्ट रेट व्हेरिएबिलिटी' (HRV) चा वापर करतात. हे दोन हृदयाच्या ठोक्यांमधील वेळेतील बदल मोजतं. व्यायाम, झोपेची कमतरता आणि रोजच्या कामाचा ताण याला तुमचं शरीर कसा प्रतिसाद देतं, हे समजण्यासाठी याची मदत होते.

ब्लड प्रेशर मॉनिटरिंग:

काही निवडक स्मार्टवॉचेसमध्ये ब्लड प्रेशर मॉनिटरिंगची सुविधा असते. रक्तदाबातील बदल सतत ट्रॅक करण्यासाठी याचा उपयोग होतो.

फॉल डिटेक्शन आणि इमर्जन्सी SOS:

मोशन सेन्सर्स आणि अल्गोरिदम वापरून, हे फीचर तुम्ही अचानक जोरात खाली पडलात तर ते ओळखतं. पडल्यानंतर जर युजरची काहीच हालचाल झाली नाही, तर हे स्मार्टवॉच आपोआप इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सना मेसेज पाठवतं किंवा इमर्जन्सी सेवांना कॉल करतं. वयस्कर लोकांसाठी आणि एकटं राहणाऱ्यांसाठी हे अतिशय सुरक्षित आणि उपयुक्त फीचर आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Grammar Checker: तुमचं रायटिंग स्किल सुधारण्याचे सोपे उपाय
Recommended image2
Cancer Surgery: कॅन्सर सर्जरीनंतर शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं का महत्त्वाचं आहे? डॉक्टरांनी सांगितलं कारण
Recommended image3
Heart Attack Signs: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं हे 6 संकेत, कधीच दुर्लक्ष करू नका
Recommended image4
Savings Schemes : कमी धोका, जास्त नफा... 8.20% व्याज देणाऱ्या सरकारी बचत योजना
Recommended image5
Smart TV Cleaning : स्मार्ट टीव्हीची स्क्रीन कशी साफ करायची?
Related Stories
Recommended image1
iPhone 18: आयफोन 18 येतोय, काय असतील नवे फीचर्स?
Recommended image2
WhatsApp Web: व्हॉट्सअॅप वापरताना काळजी घ्या, अधिकृत माहिती शेअर करू नका, केंद्राचा इशारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved