whats app: वापरल्यानंतर व्हॉट्सअॅप वेब नक्की लॉग आऊट करा. नॅशनल सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने हा महत्त्वाचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅपच्या वापराबाबत केंद्राने एक मोठा इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅपवरून अधिकृत आणि गोपनीय माहिती शेअर करू नका, अशी सूचना गृह मंत्रालयाने केली आहे. व्हॉट्सअॅप वेब अकाउंटचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वापर संपल्यानंतर नक्की लॉग आऊट करा. नॅशनल सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने हा इशारा दिला आहे. केंद्रीय सायबर सुरक्षा विभागाने सांगितले आहे की, ॲक्टिव्ह असलेल्या व्हॉट्सअॅप वेब सेशनमधून अकाउंट होल्डरला न सांगता सायबर गुन्हेगार खाजगी मेसेज पाठवू शकतात. व्हॉट्सअॅपवरून कोणतीही अधिकृत आणि आर्थिक माहिती शेअर करू नका, असा सक्त आदेश आहे. सार्वजनिक कॉम्प्युटरवर व्हॉट्सअॅप वेब वापरल्यास, काम झाल्यावर नक्की लॉग आऊट करा, असे या इशाऱ्यात स्पष्ट केले आहे