MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Smartphone Battery Charging : १००% चार्ज झाल्यावरही फोन प्लगमध्ये ठेवल्यास स्फोट होतो का? जाणून घ्या सत्य!

Smartphone Battery Charging : १००% चार्ज झाल्यावरही फोन प्लगमध्ये ठेवल्यास स्फोट होतो का? जाणून घ्या सत्य!

आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये १००% चार्जिंग पूर्ण झाल्यावर वीजपुरवठा खंडित करणारी सुरक्षा प्रणाली असते. त्यामुळे रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्याने बॅटरी लगेच खराब होत नाही किंवा फोनचा स्फोटही होत नाही.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 16 2026, 03:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
१००% चार्ज झाल्यावरही अनेक तास प्लगमध्ये तसाच ठेवता?
Image Credit : chat gpt

१००% चार्ज झाल्यावरही अनेक तास प्लगमध्ये तसाच ठेवता?

आजच्या काळात स्मार्टफोनशिवाय एक दिवस काढणंही अनेकांसाठी कठीण झालंय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. अनेक जण रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावतात आणि थेट सकाळीच काढतात. काही जणांना फोन १००% चार्ज झाल्यावरही अनेक तास प्लगमध्ये तसाच राहिल्याची चिंता नसते. पण १००% चार्जिंगनंतरही फोन तसाच ठेवल्यास बॅटरी खराब होते का? फोनचा स्फोट होण्याचा धोका असतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
हे वाचा
Image Credit : Gemini

हे वाचा

सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या. आजकालच्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये बॅटरी १००% चार्ज झाल्यावर अतिरिक्त वीज रोखण्यासाठी सुरक्षा प्रणाली असते. उदाहरणार्थ, ॲपल कंपनीने स्पष्ट केलंय की आयफोन पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग आपोआप थांबतं.

बॅटरीची पातळी ठराविक टक्क्यांनी कमी झाल्यावरच गरजेनुसार पुन्हा चार्जिंग सुरू होतं. सॅमसंगनेही त्यांच्या गाईडलाईन्समध्ये सांगितलंय की आधुनिक गॅलेक्सी फोन्समध्ये चार्जिंग कंट्रोल फीचर्स आहेत. त्यामुळे १००% चार्जिंग झाल्यावरही चार्जर लावून ठेवला, तरी बॅटरीमध्ये सतत वीज जात राहते असा त्याचा अर्थ होत नाही.

Related Articles

Related image1
iPhone 17 की iPhone 16 कोणता फोन घेणं फायद्याचं ठरेल? वाचा सर्वकाही डिटेल्स
Related image2
WhatsApp Business New Rules : १ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲप बिझनेसचे नियम बदलणार
36
Optimised Battery Charging फीचर
Image Credit : our own

Optimised Battery Charging फीचर

आधुनिक स्मार्टफोन्समधील चार्जिंग सुरक्षा फीचर्स पाहता, रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्याने सहसा कोणताही तात्काळ धोका नसतो. पण यामुळे बॅटरीच्या लाईफवर काहीच परिणाम होणार नाही, असंही ठामपणे सांगता येत नाही. कारण बॅटरी दीर्घकाळ १००% चार्ज राहिल्याने आणि उष्णता वाढल्याने तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

ॲपल कंपनीने यासाठी 'Optimised Battery Charging' हे फीचर दिलंय. हे फीचर युजरच्या चार्जिंगच्या सवयी ओळखून गरजेनुसार फोन पूर्ण चार्ज करतं. त्यामुळे रात्री फोन चार्जिंगला लावण्याबाबत जास्त घाबरण्याची गरज नाही. पण बॅटरीचं आयुष्य वाढवण्यासाठी चार्जिंग फीचर्सचा योग्य वापर करणं फायद्याचं ठरतं.

46
कारणे वाचा
Image Credit : chat gpt

कारणे वाचा

फोन १००% चार्ज झाल्यावरही चार्जरमध्ये ठेवणं हे एकमेव कारण नाही; तर उष्णता आणि बॅटरीचं रासायनिक वय (Chemical aging) हे देखील महत्त्वाचे घटक आहेत. लिथियम-आयन बॅटरी जसजशी वापरली जाते, तसतशी तिची वीज साठवण्याची क्षमता हळूहळू कमी होते. चार्जिंगच्या सवयी, तापमान आणि बॅटरीचा एकूण वापर यावर तिचं आयुष्य अवलंबून असतं.

विशेषतः जास्त उष्णता असलेल्या ठिकाणी फोन चार्ज करणं किंवा चार्जिंग सुरू असताना हेवी ग्राफिक्स वाले गेम्स खेळल्याने फोन जास्त गरम होऊ शकतो. फोन थेट उन्हात ठेवणं, गरम कारमध्ये सोडणं किंवा खराब केबल्स वापरणं या गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत.

56
किती टक्के बॅटरी चार्ज करू शकता?
Image Credit : chat gpt

किती टक्के बॅटरी चार्ज करू शकता?

यात काही अंशी तथ्य नक्कीच आहे. काही स्मार्टफोन्समध्ये बॅटरी ८०% किंवा त्या आसपास थांबवण्याचा पर्याय मिळतो. बॅटरी दीर्घकाळ १००% चार्ज राहू नये आणि तिचं आयुष्य वाढावं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. उदाहरणार्थ, काही आयफोन मॉडेल्समध्ये तुम्ही ८०% ते १००% पर्यंत चार्जिंग लिमिट सेट करू शकता.

काही सॅमसंग गॅलेक्सी मॉडेल्समध्येही 'Battery Protection' फीचर मिळतं. पण प्रत्येकाने फक्त ८०% च चार्जिंग करावं, असा कोणताही नियम नाही. ज्यांना दिवसभर फोन वापरावा लागतो, त्यांना १००% चार्जिंगची गरज भासू शकते. त्यामुळे आपल्या गरजेनुसार चार्जिंग लिमिट निवडणं हाच योग्य मार्ग आहे.

66
या गोष्टीही महत्वाच्या
Image Credit : PINTEREST

या गोष्टीही महत्वाच्या

१. बनावट चार्जर वापरू नका: नेहमी तुमच्या फोनसाठी योग्य आणि अधिकृत कंपनीचा चार्जर आणि केबल वापरा. २. उशी किंवा ब्लँकेटखाली फोन ठेवू नका: उष्णता बाहेर न पडल्यास फोन जास्त गरम होण्याचा धोका असतो. ३. चार्जिंग करताना हेवी कामे टाळा: जास्त वेळ गेम्स खेळल्याने किंवा हेवी ॲप्स वापरल्याने फोन गरम होऊ शकतो. ४. खराब केबल्स वापरू नका: वायर उघडी पडलेली किंवा लूज कनेक्शन असलेली केबल लगेच बदला. ५. फोन जास्त गरम झाल्यास लक्ष द्या: चार्जर काढून फोन सुरक्षित ठिकाणी थंड होऊ द्या. बॅटरी फुगणे, जळका वास येणे किंवा धूर निघणे अशी लक्षणे दिसल्यास फोन पुन्हा चार्ज न करता थेट सर्व्हिस सेंटर गाठा.

थोडक्यात सांगायचं तर, १००% चार्ज झाल्यावरही फोन प्लगमध्ये राहिल्याने लगेच बॅटरी खराब होत नाही किंवा स्फोट होत नाही. आधुनिक स्मार्टफोन्समध्ये चार्जिंग कंट्रोल करणारी सुरक्षा प्रणाली असते. पण बॅटरी दीर्घकाळ टिकवायची असेल, तर उष्णता टाळणे आणि चांगल्या सवयी पाळणे आवश्यक आहे. १००% चार्ज झाल्यावर लगेच चार्जर काढला नाही म्हणून घाबरण्याची गरज नाही, पण सुरक्षित चार्जिंगच्या सवयी तुमच्या फोनची बॅटरी नक्कीच उत्तम ठेवतील.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Tesla Roadster : उडणारी कार खरंच आली! टेस्लाच्या कारने हवेत मारली पलटी
Recommended image2
Railway Platform Yellow Line : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रेषेचा अर्थ माहितीये का?
Recommended image3
Electric Scooter Sales : TVS, Bajaj की Ola... इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत कोणती कंपनी आहे नंबर वन?
Recommended image4
Low Investment Business Idea : फक्त १० हजार गुंतवा आणि महिना १० हजार कमवा! तरुणांसाठी भन्नाट बिझनेस आयडिया
Recommended image5
ColorOS 17 भारतात लाँच; नव्या डिझाइनसह AI फीचर्स अन्य माहिती समोर
Related Stories
Recommended image1
iPhone 17 की iPhone 16 कोणता फोन घेणं फायद्याचं ठरेल? वाचा सर्वकाही डिटेल्स
Recommended image2
WhatsApp Business New Rules : १ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲप बिझनेसचे नियम बदलणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved