- Home
- Utility News
- Side Effects of Hot Water Baths in Winter : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर थांबा... हे धोके जाणून घ्या
Side Effects of Hot Water Baths in Winter : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर थांबा... हे धोके जाणून घ्या
Side Effects of Hot Water Baths in Winter : खरं तर, जास्त गरम पाणी शरीराचा आंतरिक समतोल बिघडवतं. याचा त्वचेपासून रक्तदाबापर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने अंघोळ का करू नये, हे जाणून घेऊया..

गरम पाणी शरीरासाठी हानिकारक
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे आनंददायी असले तरी, ही सवय आरोग्यावर परिणाम करते. जास्त गरम पाणी शरीराचा समतोल बिघडवते आणि त्वचेपासून रक्तदाबापर्यंत अनेक समस्या निर्माण करते.
त्वचा कोरडी आणि निर्जीव होते
जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल (सेबम) निघून जाते. यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. तसेच त्वचेवर लालसरपणा, जळजळ आणि खाज येऊ शकते.
केसांवरही होतो परिणाम
गरम पाण्याने अंघोळ केल्याने केसांवरही परिणाम होतो. टाळूतील नैसर्गिक तेल निघून गेल्याने केस कोरडे, निस्तेज आणि कमकुवत होतात. यामुळे केसगळतीची समस्या वाढू शकते.
रक्तदाबात अचानक वाढ
खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्तवाहिन्या पसरतात. यामुळे रक्तदाब अचानक वाढू किंवा कमी होऊ शकतो. वृद्ध आणि हृदयरोगींसाठी हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हे टाळावे.
डोळ्यांमध्ये कोरडेपणा
गरम पाण्याच्या वाफेमुळे डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, जडपणा आणि कोरडेपणा येऊ शकतो.
पायांमध्ये वेरीकोज व्हेन्स असल्यास
तुमच्या पायांमध्ये वेरीकोज व्हेन्सची समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. कारण गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्यांवरील दाब वाढून ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम
पुरुषांनी खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्येवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे भविष्यात वडील बनण्यात अडचणी येऊ शकतात.
मग उत्तम पर्याय कोणता?
हिवाळ्यात अंघोळीसाठी कोमट पाणी वापरणे सर्वात सुरक्षित आहे. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

