Top 10 Banks : ही आहेत भारतातील सर्वात मोठी बँक, कारणही खास
Top 10 Banks : सध्या बाजारमूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? टॉप 10 बँका कोणत्या आहेत? कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती आहे?, हे जाणून घेऊयात.

भारतातील टॉप 10 बँका
आजच्या काळात बँक खाते असणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारी योजनांपासून ते पैसे वाचवण्यापर्यंत सर्वत्र याची गरज असते. भारतातील सर्वाधिक मूल्य असलेल्या टॉप 10 बँकांविषयी जाणून घेऊया.
1. एचडीएफसी बँक (HDFC BANK)
HDFC ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. बाजार भांडवलानुसार देशात पहिल्या क्रमांकावर असून, तिचे बाजारमूल्य 14.35 लाख कोटी रुपये आहे.
2. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
ICICI ही भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. देशभरात 7 हजारांहून अधिक शाखा आहेत. या बँकेचे बाजारमूल्य 9.89 लाख कोटी रुपये आहे.
3. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India)
SBI ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. 1955 मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण झाले. या बँकेचे मार्केट कॅप सध्या 9.61 लाख कोटी रुपये आहे.
4. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
कोटक महिंद्रा बँक ही देशातील मोठ्या बँकांपैकी एक आहे. ती आर्थिक राजधानी मुंबईतून आपले कामकाज चालवते. तिचे मूल्य 4.26 लाख कोटी रुपये आहे.
5. ॲक्सिस बँक (Axis Bank)
ॲक्सिस बँक ही देखील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक आहे. ती बँकिंग, फायनान्स आणि डिजिटल बँकिंग सेवा पुरवते. तिचे मूल्य 4.06 लाख कोटी रुपये आहे.
6. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
बँक ऑफ बडोदा ही देखील देशात खूप लोकप्रिय आहे. लाखो ग्राहक असलेल्या या बँकेचे बाजारमूल्य 1.57 लाख कोटी रुपये आहे.
7. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. 1969 मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण झाले. सध्या या बँकेचे मूल्य 1.57 लाख कोटी रुपये आहे.
8. कॅनरा बँक (Canara Bank)
स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या बँकांपैकी कॅनरा बँक एक आहे. ही बँक 1906 मध्ये स्थापन झाली. सध्या तिचे बाजारमूल्य 1.40 लाख कोटी रुपये आहे.
टॉप 9 आणि 10 बँका
9. युनियन बँक (Union Bank)
ही एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिचे मूल्य 1.35 लाख कोटी रुपये आहे.
10. इंडियन बँक (Indian Bank)
या बँकेचे बाजारमूल्य 1.15 लाख कोटी रुपये आहे.

