MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Share Market Guide : 1 लाख गुंतवले 14 लाख मिळाले! 5 वर्षांत या स्टॉकने दिलाय तगडा रिटर्न

Share Market Guide : 1 लाख गुंतवले 14 लाख मिळाले! 5 वर्षांत या स्टॉकने दिलाय तगडा रिटर्न

मुंबई - शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर ते दुप्पट, तिप्पट झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअरची माहिती देणार आहोत ज्याने ५ वर्षांत एका लाखाचे चौदा लाख केले आहेत.

2 Min read
Asianetnews Team Marathi
Published : Aug 16 2025, 05:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नक्कीच नफा मिळू शकतो
Image Credit : Freepik

नक्कीच नफा मिळू शकतो

शेअर बाजारातील गुंतवणूक ही आजकाल खूपच सामान्य बाब आहे. चांगल्या रिटर्नच्या आशेने, अनेक लोक सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करतात. योग्य पद्धतीने आणि ठराविक रकमेची गुंतवणूक केल्यास, नक्कीच नफा मिळू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक महत्त्वाची आहे.
26
शेअरने १३६३% रिटर्न दिला
Image Credit : Gemini

शेअरने १३६३% रिटर्न दिला

शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांमध्ये गुंतवणूक करून अनेकांनी भरपूर पैसे कमावले आहेत. अशाच एका स्टॉकबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी ६१९.४० रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या ५२ आठवड्यांमधील सर्वात कमी किंमत २९५.२५ रुपये होती. आणि गेल्या पाच वर्षांत, या शेअरने १३६३% रिटर्न दिला आहे.

Related Articles

Related image1
घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवावे?
Related image2
उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?
36
कोणता आहे हा स्टॉक?
Image Credit : Gemini

कोणता आहे हा स्टॉक?

ही एक नवरत्न कंपनी आहे. रेल विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Limited). हा मुख्यतः एक सरकारी मल्टीबॅगर स्टॉक आहे. आणि याच शेअरने १ लाख रुपयांना १४ लाख रुपये बनवले आहेत. शिवाय, पुन्हा एकदा या स्टॉकच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकतेच इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडकडून या कंपनीला सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन प्रकल्पासाठी एकूण १७८.६८ कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहेत.
46
गेल्या ३ वर्षांत किती वाढ?
Image Credit : Gemini

गेल्या ३ वर्षांत किती वाढ?

या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. गेल्या पाच वर्षांत, या कंपनीच्या शेअरची किंमत १३६३% आणि गेल्या तीन वर्षांत ९४७% वाढली आहे. म्हणजेच, या कालावधीत २२.१५ रुपयांचा शेअर आता ३२४ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी, रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये २.०५ रुपये म्हणजेच ०.६३% टक्क्यांनी घसरून ३२४.२० रुपयांवर बंद झाला.
56
आज १४.६३ लाख रुपये
Image Credit : Gemini

आज १४.६३ लाख रुपये

या नवरत्न कंपनीचा शेअर गेल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी ६१९.४० रुपयांवर पोहोचला आहे. आणि गेल्या ५२ आठवड्यांमधील सर्वात कमी किंमत २९५.२५ रुपये आहे. त्यामुळे जर कोणी पाच वर्षांपूर्वी, रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत धरून ठेवली असती, तर त्यांच्याकडे आज १४.६३ लाख रुपये असते.
66
२०२६ मध्ये उत्पन्न २०२५ पेक्षा जास्त असेल
Image Credit : Getty

२०२६ मध्ये उत्पन्न २०२५ पेक्षा जास्त असेल

मात्र २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालानुसार, आरव्हीएनएलचा ४०% नफा कमी झाला आहे. तरीही कंपनीला आशा आहे की, २०२६ मध्ये त्यांचे उत्पन्न २०२५ पेक्षा जास्त असेल. दरम्यान, अँटिक स्टॉक ब्रोकिंग कंपनीने या शेअरला सेल रेटिंग दिले आहे. जे पूर्णपणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आहे. 

**सूचना**: बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Perfect Bra : आता चिंता नको, दिवसभर आरामदायी वाटेल; सैल, ओघळलेल्या स्तनांसाठी 'या' आहेत बेस्ट ब्रा
Recommended image2
Rice Flour : सुरकुत्यांपासून ब्लॅकहेड्सपर्यंत सर्वकाही दूर करेल 'तांदळाचे पीठ'
Recommended image3
Coconut Milk : बारीक मुलांना बनवा गुबगुबीत, मुलांसाठी नारळाचे दूध म्हणजे वरदानच
Recommended image4
AI Tools : अरे! इतके दिवस हे माहीतच नव्हतं?, हे आहेत तुमचं काम सोपं करणारे 9 AI टूल्स!
Recommended image5
Lipoma Removal Remedies : चरबीच्या गाठीवर 'हे' आहेत घरगुती उपाय, गाठ लवकरच विरघळेल
Related Stories
Recommended image1
घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवावे?
Recommended image2
उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved