सार
Samsung Galaxy Smartphone Festive Offer : सॅमसंग स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर, फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत काही कंपन्या आपल्या प्राइम स्मार्टफोनवर धामाकेदार सूट देत आहे.
Samsung Galaxy Smartphone Price Drop : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फेस्टिव्हल सीजनचा सेल सुरु होणार आहे. याआधीच वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रोडक्ट्सवरील ऑफर आणि सेलची घोषणा करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर येत्या 27 सप्टेंबरपासून सेल सुरु होणार आहे. अशातच सॅमसंग कंपनीने आपल्या वेगवेगळ्या गॅलेक्सी फोनच्या मॉडेलच्या किंमतीत जबरदस्त घट करत असल्याची घोषणा केली आहे. असे सांगितले जात आहे की, कंपनी फोनवर अशा काही ऑफर्स देतेय ज्यामुळे मूळ किंमतीच्याही अर्ध्या किंमतीत फोन खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S23 FE, S23, S23 Ultra, S24+ स्मार्टफोनवरील ऑफर 26 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. जाणून घेऊया ऑफर्सबद्दल सविस्तर...
सॅमसंग स्मार्टफोनवरील ऑफर्स
- सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी S23Ultra आणि S23 FE सारख्या स्मार्टफोनवर 40 हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, ही प्रमोशनल किंमत फेस्टिव्ह ऑफरचा हिस्सा असून त्यामध्ये बँक ऑफरचाही समावेश आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी S23FE ची मूळ किंमत 54,999 रुपये असून ऑफर अंतर्गत स्मार्टफोन केवळ 27,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच फोनवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी S23 स्मार्टफोन 74,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. पण ऑफर अंतर्गत 37,999 रुपयांना खरेदी करु शकता. म्हणजेच अर्ध्या किंमतीत फोन खरेदी करण्याची संधी फेस्टिव्ह सीजनमध्ये मिळणार आहे.
- कंपनीचा प्रीमियम सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा स्मार्टफोनची मूळ किंमत 1,09,999 रुपये आहे. पण ऑफरमध्ये स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 69,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
- याशिवाय सॅमसंग कंपनीचा लेटेस्ट फोन गॅलेक्सी S24 अल्ट्राही कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. फोनची मूळ किंमत 1,41,999 रुपये असून ऑफरमध्ये 1,31,999 रुपयांत खरेदी करता येईल. कंपनीचा गॅलेक्सी S24+ स्मार्टफोन 64,999 रुपये तर गॅलेक्सी S24 स्मार्टफोन तुम्हाला 59,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
आणखी वाचा :
पैशांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी 5 खास टिप्स, रहाल टेन्शन फ्री
Reliance Power Share : वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा