MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • PM Kisan Yojana: पीएम किसानच्या नियमात मोठा बदल; महाराष्ट्रासह 'या' १४ राज्यांतील शेतकऱ्यांना आता 'हे' कार्ड बंधनकारक!

PM Kisan Yojana: पीएम किसानच्या नियमात मोठा बदल; महाराष्ट्रासह 'या' १४ राज्यांतील शेतकऱ्यांना आता 'हे' कार्ड बंधनकारक!

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. आता २३ वा हप्ता मिळवण्यासाठी 'युनिक फार्मर आयडी' असणे बंधनकारक आहे. फसवणूक टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 08 2026, 03:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
मोठी बातमी! पीएम किसानच्या नियमात मोठा बदल
Image Credit : iSTOCK

मोठी बातमी! पीएम किसानच्या नियमात मोठा बदल

PM Kisan Yojana Update: जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, आता पुढील हप्ता मिळवण्यासाठी एक नवीन अट पूर्ण करावी लागणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
२३ व्या हप्त्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय
Image Credit : iSTOCK

२३ व्या हप्त्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय

पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता मार्च २०२६ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता देशोभरातील शेतकरी २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांकडे 'युनिक फार्मर आयडी' (Farmer ID) नसेल, त्यांना पुढील २,००० रुपये मिळणार नाहीत. 

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात 'उन्हाचा तडाखा' वाढणार! अवकाळीचा जोर ओसरला, आता उष्णतेच्या लाटेचे सावट; वाचा तुमच्या जिल्ह्याची स्थिती
Related image2
Shaktipeeth Mahamarg Village List: कोल्हापूरचा कायापालट! 'शक्तिपीठ' महामार्गाचा नवा आराखडा मंजूर; ७३ गावांतून धावणार हायवे, पाहा संपूर्ण यादी
37
महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये नियम लागू
Image Credit : iSTOCK

महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये नियम लागू

योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सध्या हा नियम खालील राज्यांमध्ये अनिवार्य करण्यात आला आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश.

राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा.

आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा.

महत्त्वाची नोंद: २०२६ पासून नवीन नोंदणी करणाऱ्यांसाठी हा नियम बंधनकारक आहेच, पण जुन्या लाभार्थ्यांनाही हा आयडी तयार करावा लागणार आहे. 

47
काय आहे हे 'शेतकरी ओळखपत्र' (Farmer ID)?
Image Credit : Freepik

काय आहे हे 'शेतकरी ओळखपत्र' (Farmer ID)?

हे एक डिजिटल ओळखपत्र आहे जे शेतकऱ्यांच्या शेतीचा संपूर्ण 'बायोडाटा' असेल. यात खालील माहिती समाविष्ट असेल

शेतजमिनीचा तपशील.

घेतलेली पिके आणि खतांचा वापर.

पशुपालन आणि वार्षिक उत्पन्न.

फायदा काय? यामुळे शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कचेऱ्यांमध्ये कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. अनुदान, बियाणे, खते आणि पीक विमा मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे. 

57
घरबसल्या असे मिळवा ओळखपत्र!
Image Credit : iSTOCK

घरबसल्या असे मिळवा ओळखपत्र!

शेतकरी ओळखपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.

AgriStack (ॲग्रीस्टॅक) किंवा राज्याच्या कृषी विभागाच्या पोर्टलला भेट द्या.

तुमचा आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर जवळ ठेवा.

जमिनीची कागदपत्रे (७/१२, ८-अ किंवा खसरा) अपलोड करा.

e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. 

67
२३ वा हप्ता कधी जमा होणार?
Image Credit : iSTOCK

२३ वा हप्ता कधी जमा होणार?

पीएम किसान योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात.

२१ वा हप्ता: नोव्हेंबर २०२५

२२ वा हप्ता: मार्च २०२६

२३ वा हप्ता (अपेक्षित): जून किंवा जुलै २०२६ दरम्यान. 

77
मदत हवी असल्यास येथे संपर्क करा
Image Credit : iSTOCK

मदत हवी असल्यास येथे संपर्क करा

जर तुम्हाला आयडी बनवताना किंवा हप्त्याबाबत काही अडचण आली, तर तुम्ही खालील अधिकृत क्रमांकावर संपर्क साधू शकता:

टोल-फ्री हेल्पलाईन: १५५२६१ / १८००११५५२६

ईमेल आयडी: pmkisan-ict@gov.in

शेतकरी मित्रांनो, उशीर करू नका! तुमचा २३ वा हप्ता अडकू नये असे वाटत असेल, तर आजच 'फार्मर आयडी'ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bakri Eid Special: हातांच्या बॅक साइडसाठी ही आहेत सुंदर डिझाइन्स
Recommended image2
Car Market: तुमचा पगार 20 हजार आहे? मग या आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट कार्स!
Recommended image3
Gardening Tip: तुरटीच्या पाण्याने पुदिन्याचं रोपटं बनेल हिरवंगार! अनुभव घेऊन बघा
Recommended image4
Vastu Tips: मुख्य दरवाजातून करकर आवाज येतोय? हे आहे मोठ्या संकटाचं लक्षण!
Recommended image5
Hair Care Tip: नारळाचं दूध असं वापरा, केस होतील मजबूत आणि चमकदार
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात 'उन्हाचा तडाखा' वाढणार! अवकाळीचा जोर ओसरला, आता उष्णतेच्या लाटेचे सावट; वाचा तुमच्या जिल्ह्याची स्थिती
Recommended image2
Shaktipeeth Mahamarg Village List: कोल्हापूरचा कायापालट! 'शक्तिपीठ' महामार्गाचा नवा आराखडा मंजूर; ७३ गावांतून धावणार हायवे, पाहा संपूर्ण यादी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved