- Home
- Utility News
- PM Kisan Update: होळीपूर्वी की नंतर? पीएम किसानच्या २२ व्या हप्त्याचे पैसे खात्यात कधी येणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट!
PM Kisan Update: होळीपूर्वी की नंतर? पीएम किसानच्या २२ व्या हप्त्याचे पैसे खात्यात कधी येणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट!
PM Kisan installment : PM किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो फेब्रुवारीऐवजी मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे. हा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी, बँक खात्याशी आधार लिंकिंग, लँड सीडिंग ही 3 कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.

PM Kisan च्या २२ व्या हप्त्याचे पैसे खात्यात कधी येणार?
मुंबई : देशातील कोट्यवधी बळीराजा सध्या एकाच प्रश्नाची प्रतीक्षा करत आहे. "पीएम किसानचा २२ वा हप्ता कधी जमा होणार?" बदलत्या हवामानामुळे आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' (PM-Kisan) मोठा आधार ठरत आहे. आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते यशस्वीपणे वितरित झाले असून, २२ व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
फेब्रुवारी संपला, आता सर्वांचे लक्ष मार्चकडे!
नियोजनानुसार २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता हा हप्ता होळीच्या सणापूर्वी मिळणार की त्यानंतर, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. होळीपूर्वी शक्यता किती? साधारणपणे निधी वितरणाआधी सरकार किमान आठवडाभर आधी सूचना देते. सध्या अशी कोणतीही हालचाल दिसत नसल्याने, होळीपूर्वी पैसे मिळण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येत आहे. मार्चमध्ये धमाका? तज्ज्ञांच्या मते, मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सरकार २२ व्या हप्त्याची घोषणा करण्याची शक्यता दाट आहे.
'या' ३ गोष्टी पूर्ण नसतील तर हप्ता अडकणार!
२१ व्या हप्त्याचा लाभ ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकतात. जर तुम्हाला २२ वा हप्ता हवा असेल, तर खालील गोष्टी त्वरित तपासा.
e-KYC: तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे का? (सर्वात महत्त्वाचे)
आधार लिंकिंग: बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
लँड सीडिंग: जमिनीची नोंदणी (Land Seeding) पोर्टलवर अपडेट केलेली असावी.
टीप: जर तुमच्या अर्जात किंवा कागदपत्रांत छोटीशी जरी चूक असेल, तर २,००० रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे 'पीएम किसान'च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले 'Status' नक्की तपासा.
वर्षाला मिळतात ६ हजार रुपये
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६,००० रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाते.

