जन्मतारीख: या तारखांना जन्मलेल्यांनी दारू पिऊ नये, मांस खाऊ नये, माहित आहे का?
Birth Date: ज्योतिषशास्त्रानुसार, काही तारखा शक्तिशाली ग्रहांशी संबंधित असतात. त्यामुळं सूर्य, केतू, गुरु, चंद्र आणि शनीच्या प्रभावाखाली जन्मलेल्या लोकांनी दारू आणि मांसाहार टाळावा, अस हे शास्त्र सांगतयं…

जन्मतारीख
ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेले लोक आणि त्यांचे शासक ग्रह आपण करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी अनुकूल नसतात. अशा गोष्टींमध्ये सहभागी झाल्यास दुर्दैव वाढण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया, अंकशास्त्रानुसार कोणत्या तारखेला जन्मलेल्या लोकांनी चुकूनही दारू आणि मांसाहार करू नये...
क्रमांक १..
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ तारखेला जन्मलेले लोक क्रमांक १ च्या अंतर्गत येतात. त्यांच्यावर सूर्य ग्रहाचे राज्य असते. या तारखांना जन्मलेल्यांनी सात्विक आहार घ्यावा. इतकेच नाही तर, या लोकांनी दारू पिणे आणि मांसाहार करणे टाळावे. चुकूनही त्यांनी हे केल्यास, नकारात्मक ऊर्जा आकर्षित होण्याची शक्यता असते.
क्रमांक ७..
कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेले लोक क्रमांक ७ च्या अंतर्गत येतात. या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असतो. हा एक छाया ग्रह असला तरी, तो अध्यात्माचे प्रतीक आहे. त्यामुळे या तारखांना जन्मलेल्या लोकांनी मद्यपान करणे चांगले नाही. यामुळे त्यांचा तणाव वाढण्याची शक्यता असते.
क्रमांक ३..
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेले लोक क्रमांक ३ च्या अंतर्गत येतात. या लोकांवर गुरु ग्रहाचे राज्य असते. म्हणूनच या तारखांना जन्मलेल्यांनी दारू आणि मांसाहारापासून दूर राहावे. असे न केल्यास त्यांच्यापासून नकारात्मक ऊर्जा तर वाढतेच, पण नशीबही दूर जाते. ते अनावश्यक अडचणीत सापडू शकतात.
क्रमांक ८...
कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेले लोक क्रमांक ८ च्या अंतर्गत येतात. त्यांच्यावर शनी ग्रहाचे राज्य असते. या तारखांना जन्मलेल्यांनीही अशी कामे करू नयेत. त्यांनी शक्यतोवर दारू आणि मांसाहारापासून दूर राहावे. अन्यथा, दुर्दैव त्यांचा पाठलाग करते. जीवनात अडथळे आणि आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. त्यांना शनीच्या क्रोधालाही सामोरे जावे लागू शकते.

