Numerology : 2026 कसे असेल? या तारखेला जन्मलेल्यांसाठी ठरेल टर्निंग पॉईंट
Numerology : नव्या वर्षाच्या स्वागताला सर्व सज्ज आहेत. अंकशास्त्रानुसार, 2026 वर्ष काही मूलांक असलेल्या लोकांचे आयुष्य नव्या दिशेला नेणारे ठरेल. करिअर, आर्थिक स्थिती, वैयक्तिक विकासात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ते कोणते मूलांक आहेत, जाणून घेऊया.

मूलांक 1 : ओळख मिळण्याचा काळ
मूलांक 1 असलेल्या लोकांना 2026 मध्ये वेगळी ओळख मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या जबाबदाऱ्या वाढतील. बढतीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठिंबा मिळेल. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. आत्मविश्वासाने पुढे गेल्यास चांगले परिणाम मिळतील.
मूलांक 2 : नातेसंबंध आणि स्थिरता
मूलांक 2 असलेल्यांसाठी हे वर्ष भावनिक संतुलन देणारे ठरेल. वैयक्तिक नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी स्थिरता येईल. मीडिया, डिझाइन, समुपदेशन आणि जनसंपर्क यांसारख्या क्षेत्रातील लोक प्रगती करतील. सर्जनशील कल्पनांना यश मिळेल.
मूलांक 4 : महत्त्वाचा टर्निंग पॉईंट
मूलांक 4 असलेल्यांसाठी 2026 हे वर्ष महत्त्वाचे बदल घडवून आणेल. आयुष्य नव्या संधींच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान, रिअल इस्टेट आणि इतर क्षेत्रांत काम करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात काही अनिश्चितता असू शकते, त्यामुळे त्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे.
मूलांक 5 : नवीन ओळखी
मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी प्रवास आणि नवीन ओळखी आयुष्यात उत्साह आणतील. नोकरीत बदल आणि बढतीची शक्यता आहे. स्वतंत्रपणे काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
मूलांक 7 : या क्षेत्रांमध्ये प्रगती
मूलांक 7 असलेल्या लोकांची 2026 मध्ये बौद्धिक क्षमता वाढेल. ज्ञान, संशोधन आणि आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना प्रगती दिसेल. लेखक, शिक्षक आणि संशोधकांना चांगले परिणाम मिळतील. योग, ध्यान आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल.
मूलांक कसा काढायचा?
मूलांक काढण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुमची जन्मतारीख घ्या. जर जन्मतारीख दोन अंकी असेल, तर त्या अंकांची बेरीज करून येणारा अंक म्हणजे तुमचा मूलांक. उदाहरणार्थ, जन्मतारीख 5 असल्यास मूलांक 5 असेल. त्याचप्रमाणे, जन्मतारीख 14 असल्यास मूलांक 1 + 4 = 5 असेल.
टीप : येथे दिलेली माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

