Date of birth : या चार तारखांना जन्मलेल्या कन्या जन्मदात्यासाठी असतात भाग्यवान..
Date of birth : अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली आपल्या वडिलांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. त्या त्यांच्या आयुष्यात अद्भुत बदल घडवून आणतात. कोणत्या तारखांना जन्मलेल्या मुली वडिलांसाठी लक्ष्मी समान ठरतात, हे जाणून घ्या.

मूलांक 3 असलेल्या मुली
मूलांक 3 वर गुरू ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 3 असतो. याचा स्वामी गुरू ग्रह आहे. गुरू ग्रह ज्ञान आणि सन्मानाचे प्रतीक आहे. या तारखांना जन्मलेल्या मुलींच्या वडिलांचा समाजात सन्मान वाढतो. त्यांनी हाती घेतलेल्या कामांमधील अडथळे दूर होतात. त्यांचे वडील यशाच्या मार्गावर चालतात. त्यांच्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
मूलांक सहा असलेल्या मुली
मूलांक 6 असलेल्या मुलींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 6 असतो. याचा स्वामी शुक्र आहे. शुक्र ग्रह संपत्ती आणि आनंदाचा कारक मानला जातो. त्यामुळे या मूलांकाच्या मुली जन्माला आल्यानंतर वडिलांना खूप फायदा होतो. त्यांच्या आयुष्यात आनंद येतो. घरात चैनीच्या वस्तू खरेदी करू शकतात. तसेच घरात शांततेचे वातावरण राहते. या मुली आपल्या वडिलांसाठी भाग्यदेवतांसारख्या असतात.
मूलांक 5 असेल तर..
मूलांक 5 असलेल्या मुलींवर बुध ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 5 असतो. याचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह व्यापार आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. मूलांक 5 असलेल्या मुली वडिलांच्या व्यवसायासाठी लक्ष्मी देवीसारख्या ठरतात. वडिलांना करिअरमध्ये नवीन संधी मिळतात. त्यांची बुद्धिमत्ता अप्रत्यक्षपणे वडिलांच्या करिअरच्या वाढीस मदत करते. आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होते.
मूलांक 1
मूलांक 1 असलेल्या मुलींवर सूर्य ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 1 असतो. यांचे स्वामी सूर्य देव आहेत. सूर्य नेतृत्व आणि पित्याचा कारक मानला जातो. या मूलांकाच्या मुली खूप शक्तिशाली असतात. त्यांच्या जन्मानंतर वडिलांचे सर्व त्रास दूर होतात. त्यांच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडतात. या मुली स्वतःच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने उच्च पदावर पोहोचतात.

