- Home
- Utility News
- सावधान! ३१ डिसेंबरनंतर तुमचे पॅन कार्ड ठप्प होणार? घरबसल्या मिनिटांत तपासा 'आधार-पॅन' लिंक स्टेटस
सावधान! ३१ डिसेंबरनंतर तुमचे पॅन कार्ड ठप्प होणार? घरबसल्या मिनिटांत तपासा 'आधार-पॅन' लिंक स्टेटस
PAN-Aadhaar Link Status Check : पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे, अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊन आर्थिक व्यवहार थांबू शकतात. तुमचे कार्ड लिंक आहे की नाही, हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धत चेक करता येईल.

३१ डिसेंबरनंतर तुमचे पॅन कार्ड ठप्प होणार?
PAN-Aadhaar Link Status Check : आधार आणि पॅन कार्ड ही केवळ कागदपत्रे नसून तुमच्या आर्थिक व्यवहारांची 'लाईफलाईन' आहेत. बँकेत खाते उघडण्यापासून ते शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य आहे. मात्र, सरकारने पॅन-आधार लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. जर तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केले नाही, तर तुमच्या खिशातील पॅन कार्ड केवळ 'प्लास्टिकचा तुकडा' ठरेल. अनेकांना आपले कार्ड लिंक आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. चला तर मग, जाणून घेऊया तुमचे स्टेटस तपासण्याच्या दोन अत्यंत सोप्या पद्धती.
पॅन कार्ड 'इनअॅक्टिव्ह' झाले तर काय होईल?
जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर तुम्हाला खालील संकटांचा सामना करावा लागेल.
बँकिंग व्यवहार ठप्प: तुमचे KYC फेल होईल आणि पगार जमा होण्यास अडथळे येतील.
गुंतवणूक फ्रीज: म्युच्युअल फंड (SIP) आणि शेअर बाजारातील व्यवहार बंद पडतील.
रिफंड अडकणार: आयकराचा परतावा (Income Tax Refund) मिळणार नाही.
जादा टीडीएस: तुम्हाला दुप्पट दराने TDS भरावा लागू शकतो.
ऑनलाईन स्टेटस कसे तपासायचे? (Quick Steps)
१. सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
२. होमपेजवर 'Quick Links' या पर्यायामध्ये 'Link Aadhaar Status' वर क्लिक करा.
३. तुमचा १० अंकी पॅन नंबर आणि १२ अंकी आधार नंबर अचूक टाका.
४. 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करताच तुमचे कार्ड लिंक आहे की नाही, याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
इंटरनेट नाही? काळजी नको, 'SMS' द्वारे तपासा!
जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल, तरीही तुम्ही एका साध्या मेसेजद्वारे स्टेटस जाणून घेऊ शकता.
तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा.
UIDPAN <तुमचा १२ अंकी आधार नंबर> <तुमचा १० अंकी पॅन नंबर> असा मेसेज टाईप करा.
हा मेसेज 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.
काही वेळातच तुम्हाला स्टेटसचा मेसेज येईल.
महत्त्वाची सूचना
हातात फक्त काही तास शिल्लक आहेत! मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आजच तुमचे स्टेटस तपासा आणि ही माहिती आपल्या मित्र-परिवाराला नक्की शेअर करा.

